पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पंढरपूरमधील मठाधिपतींच्या हत्येनंतर पोलिस तपासात धक्कादायक माहिती उघड

महाराष्ट्रात एका महिलेचा खून

पंढरपूरमध्ये कराडकर मठात दोन दिवसांपूर्वी झालेल्या हत्येच्या तपासात पंढरपूर पोलिसांच्या हाती नवी माहिती आली आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेले या मठाचे माजी मठाधिपती हभप बाजीराव कराडकर यांनी वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मार्गदर्शक बंडातात्या कराडकर यांच्याही हत्येचा कट रचला होता, अशी माहिती पुढे आली आहे. काही वृत्तवाहिन्यांनी या संदर्भातील वृत्त प्रसारित केले आहे.

लग्नाला नकार दिला म्हणून त्याने तिचा खून केला आणि नंतर...

मठाधिपती होण्याच्या वादातून मंगळवारी पंढरपूरमध्ये कराडकर मठाचे मठाधिपती हभप जयवंत महाराज पिसाळ यांची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी बाजीराव कराडकर यांना अटक केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूरच्या अनिलनगर येथे कराडकर मठ आहे. या मठाच्या मठाधिपती जयवंत महाराज पिसाळ यांची नव्याने नियुक्ती झाली. यावरुन बाजीराव कराडकर आणि जयवंत महाराज पिसाळ यांच्यात वाद झाला. या वादानंतर बाजीराव कराडकर यांनी जयवंत महाराज यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात जयवंत महाराज यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी बाजीराव कराडकर यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.

दीपिकाच्या छपाक सिनेमाची तिकीटे रद्द केल्याचे ते स्क्रिनशॉट किती खरे?

पोलिसांनी याप्रकरणी बाजीराव कराडकर यांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्यांनी बंडातात्या कराडकर यांच्याही हत्येचा कट रचला होता, अशी कबुली पोलिसांकडे दिली. बंडातात्या कराडकर यांच्यामुळेच माझे मठाधिपती पद गेले. त्यामुळे राग आल्याने बाजीराव कराडकर यांनी त्यांच्या हत्येचा कट रचला होता, अशी माहिती मिळते आहे. पंढरपूर पोलिस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.