पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धक्कादायक! शिवशाही बसने तीन वर्षाच्या चिमुकलीला चिरडले

इंदापूर अपघात

शिवशाही बसने तीन वर्षाच्या चिमुकलीला चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील इंदापूरजवळील लोणी देवकर उड्डाणपुलावर ही घटना घडली आहे. या घटनेमुळे लोणी देवकर गावात खळबळ उडाली आहे. या अपघातानंतर संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी महामार्गावर रास्तारोको केला.  

 

अशोभनीय, निंदनीय..नव्या व्हिडिओवर, संभाजीराजे संतप्त

रिया प्रेमकुमार गौतम असं मृत चिमुकलीचे नाव आहे.  सकाळी साडेआठ वाजता रिया उड्डाणपुलावरील रस्ता ओलांडत असताना वेगाने आलेल्या शिवशाही बसने तिला चिरडले. यामध्ये रियाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी रास्तारोको केला. त्यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. 

'नाईट लाईफ भारतीय संस्कृती नाही, यामुळे निर्भयासारख्या घटना

इंदापूरचे पोलिस निरीक्षक मधुकर पवार, महामार्ग पोलिस केंद्राचे सहायक पोलिस निरीक्षक, अभिजीत अभंग यांनी स्थानिकांची समजूत काढल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. दरम्यान, रियाचे वडील एमआयडीसीमध्ये मजुरीचे काम करतात. बिहारवरुन हे कुटुंबिय कामानिमित्त लोणी देवकर येथे आले होते. रिया त्यांची एकुलती एक मुलगी होती. 

प्रियांका गांधींच्या सक्रीय राजकारणाचे एक वर्ष आणि सहा मुद्दे