पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सत्तापदांच्या समान वाटपासाठी शिवसेना आग्रही, लढत राहण्याचे वचन

शिवसेना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार असल्याचे बुधवारी स्पष्ट केले असले तरी शिवसेनेला सत्तेत समसमान वाटा दिला जाणार का, याबद्दल त्यांनी काहीच वक्तव्य केलेले नाही. तर दुसरीकडे शिवसेनेने गुरुवारी आपले मुखपत्र असलेल्या 'सामना' दैनिकामधून शिवसेनेचा बाणा लढाऊपणाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेचा वसा घेऊन शिवसेना पुढे जात आहे. मग या प्रवासात पेच पडो किंवा चक्रव्युह निर्माण होवो. लढणाऱ्यांना संकटांची पर्वा ती काय, असे सांगत अजून शिवसेना आपल्या हक्कासाठी, सत्तेत समान वाट्यासाठी लढत राहणार असल्याचे स्पष्ट केले.

७२ वर्षाचा इतिहास बदलला; जम्मू-काश्मीर, लडाख नवे केंद्रशासित प्रदेश

अग्रलेखात म्हटले आहे की, २४ तारखेला निकाल लागले तरी महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या हालचाली अजून झालेल्या नाहीत. महायुतीला जनादेश मिळाला असला, तरी सत्तापदांचे समान वाटप हाच सध्या कळीचा मुद्दा आहे. युती किंवा आघाडीमध्ये कोणी किती जागा जिंकल्या या पेक्षा परस्परांमध्ये सत्तावाटपाचा करार काय झाला आहे, हे जास्त महत्त्वाचे आहे. निकाल आल्यानंतर हा करार पाळणे महत्त्वाचे आणि विश्वासार्हतेचे असते. सत्तापदांचे समान वाटप हा शब्द मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी जाहीर पत्रकार परिषेदत वापरला होता, याचीही आठवण या अग्रलेखातून पुन्हा एकदा करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्रीपद हे सत्तापदात येत नाही असे जर कोणाला वाटत असेल तर राज्यशास्त्राचे धडे नव्याने लिहावे लागतील, असाही टोला लगावण्यात आला आहे.

मोदींनी घेतली त्यांच्या मातोश्रींची भेट

जर सर्वकाही आधी ठरले होते. तर मग आता पेच पडायचे कारणच काय, असा प्रश्न उपस्थित करून सध्या धर्मग्रंथावर हात ठेवून लोक शपथेवर खोटे बोलतात असा जमाना आहे. पण शिवसेना दिलेला शब्द पाळते. शिवसेनाप्रमुखांकडून हा संस्कार शिवसेनेवर झाला असल्याचे सांगत भाजपनेही दिलेला शब्द पाळला पाहिजे, अशी आठवण करून देण्यात आली आहे.