पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मनसे मोर्चाला भाजपची साथ! संदीप देशपांडेंनी दिलं सेनेला उत्तर

संदीप देशपांडे आणि मनीषा कायंदे

पाक आणि बांगलादेश घुसखोरांविरुद्ध मनसेच्या महामोर्चाला भाजपचा पाठिंबा असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी 'एबीपी माझा' या वृत्तवाहिला प्रतिक्रिया देताना मनसेवर आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपाला मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सत्तेसाठी राष्ट्रवादीसोबत जाणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेवर तोफ डागली आहे. शिवसेनाही राष्ट्रवादीची बी टीम असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.  

MNS Rally : महामोर्चासंदर्भातील सर्व अपडेट्स एका क्लिकवर

मराठीच्या मुद्द्यावरून राजकारण करणाऱ्या मनसेनं काही दिवसांपूर्वीच पक्षाचा झेंडा भगवा करुन कट्टर हिंदूत्ववादाचा मार्ग निवडल्याचे संकेत दिले. महाअधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील घुसखोरांचा मुद्दा उचलला. याच पार्श्वभूमीवर पाक आणि बांगलादेश घुसघोरांविरोधात आज मुंबईत  मनसेच्यावतीने महामोर्चा आझाद मैदानावर धडकणार आहे. 

महामोर्चासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून हजारो मनसे सैनिक मुंबईत!

मनसेच्या या भूमिकेमागे भाजपचा हात असल्याचे मनीषा कायंदे यांनी म्हटले आहे. भाजप स्वबळावर काही करु शकत नाही. शिवसेनेने त्यांची साथ सोडल्यामुळे ते आता मनसेला सोबत घेण्याची खेळी करत आहेत, असेही मनीषा कायंदे यांनी म्हटले आहे. मनसेच्या महामोर्चामुळे शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यामुळे शिवसेनेकडून अशी वक्तव्य केली जात आहेत, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.