पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO : १०० दिवसांत काय केले १११ सेकंदात पाहा, शिवसेनेचा खास व्हिडिओ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानिमित्त शिवसेनेने एक खास व्हिडिओ शनिवारी सोशल मीडियावर जारी केला. या व्हिडिओमध्ये १०० दिवसांत सरकारने काय केले हे अवघ्या १११ सेकंदात दाखविण्यात आले आहे. सरकारने घेतलेले वेगवेगळे निर्णय यांचा धावता आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. इंग्रजीमध्ये हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे.

'आमचे आमदार विकायला नाही ठेवलेले'

राज्यात गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचे मिळून महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले. या सरकारला १०० दिवस पूर्ण होताहेत म्हणूनच उद्धव ठाकरे सहकुटूंब शनिवारी अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यावर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा आहे. 

सोशल मीडियावर आपल्या सरकारच्या निर्णयांचा आणि धोरणांचा प्रचार करण्याचे काम शिवसेनेकडून सातत्याने केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी हा व्हिडिओ जारी करण्यात आला. या व्हिडिओमध्ये शेतकरी कर्जमाफी, भूमीपुत्रांसाठी घेतलेले निर्णय, औरंगाबाद विमानतळाला दिलेले छत्रपती संभाजी महाराजांचे नाव इत्यादी निर्णयाचा धावता आढावा घेण्यात आला आहे. 

बिहारमध्ये भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, चौघे जखमी

आमचे सरकार पाच वर्षे टिकेल आणि पुढे १५ ते २० वर्षे आम्हीच सत्तेत राहू असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.