पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अखंड हिंदुस्थानचे निम्मे स्वप्न पूर्ण झाले, शिवसेनेकडून सरकारचे कौतुक

नरेंद्र मोदी आणि अमित शहा

कलम ३७० रद्द करण्याच्या आणि जम्मू-काश्मीरचे विभाजन करून दोन वेगळे केंद्रशासित प्रदेश करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे शिवसेनेने स्वागत केले. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना' दैनिकातील अग्रलेखातून याआधी बरेचवेळा केंद्रातील प्रमुख सत्ताधारी भाजपचे कान टोचण्यात आले आहेत. पण ३७० कलम रद्द करण्याच्या निर्णयाचे शिवसेनेने तोंडभरून कौतुक केले. अखंड हिंदुस्थानचे निम्मे स्वप्न पूर्ण झाले आहे. भविष्यात पाकव्याप्त काश्मीरच नव्हे, तर पाकिस्तानही विलीन करून घेण्याची ताकद आणि धमक या सरकारमध्ये आहे, असे या अग्रलेखात लिहिण्यात आले आहे.

कलम ३७० : अमित शहा यांना कोणाची मदत होती माहितीये?

शिवसेनेच्या अग्रलेखात म्हटले आहे की, कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेऊन ७० वर्षांपासून हिंदुस्थानच्या माथ्यावर लागलेला कलंक सरकारने नष्ट केला. काश्मिरचे खऱ्या अर्थाने आता भारतात विलीनकरण झाले आहे. देशद्रोह्यांच्या छाताडावर बसून बजावलेल्या या धाडसी, साहसी, अदभूत आणि अचाट कामगिरीबद्दल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, दीनदयाळ उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी आणि अटलबिहारी वाजपेयी स्वर्गातून आज या सरकारवर नक्कीच पुष्पवृष्टी करत असतील. अखंड हिंदुस्थानचे निम्मे स्वप्न पूर्ण झाले आहे. भविष्यात पाकव्याप्त काश्मीरच नव्हे, तर पाकिस्तानही विलीन करून घेण्याची ताकद आणि धमक या सरकारमध्ये आहे.

राम मंदिर प्रश्नावर आजपासून सुप्रीम कोर्टात रोज सुनावणी

हिंदुस्थानच्या नकाशावर असूनही कलम ३७० मुळे जम्मू-काश्मिरला जो विशेष राज्याचा दर्जा देण्याची ऐतिहासिक घोडचूक ७० वर्षांपूर्वी झाली होती. ती चूक दुरुस्त करण्याचे महान कार्य मोदी सरकारने संसदेत पार पडले, असे म्हणत सरकारच्या निर्णयाचे अग्रलेखातून कौतुक करण्यात आले आहे.