पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षासाठी शिवसेना-राष्ट्रवादी आक्रमक

धनंजय मुंडे आणि उदय सामंत

राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष बंद करण्यात आला आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करणारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष लवकरात लवकर सुरु करा आणि गोरगरीब जनतेला तात्काळ मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

नव्या आघाडीत मुख्यमंत्री शिवसेनेचाच यावर शिक्कामोर्तब, पण...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष बंद झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी राज्यपालांना पत्र लिहून हा कक्ष सुरु करावा अशी मागणी केली आहे. राज्यपालांनी या पत्राची दखल घेत राज्यातील हजारो गरीब रुग्णांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे. याबाबत धनंजय मुंडे यांनी ट्विट केले आहे. तर, दुसरीकडे शिवसेना देखील आक्रमक झाली आहे. हा कक्ष तात्काळ चालू करावा यासाठी शिवसेनेचे उपनेते उदय सामंत मंत्रालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. 

राज्यात पुन्हा भाजपचंच सरकार येणार: फडणवीस

राज्यामध्ये सत्ता स्थापनेचा पेच सुटत नसल्यामुळे अखेर राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू केली. याचा सर्वात जास्त फटका राज्यातील रुग्णांना बसत आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे मंत्रालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाला टाळे लावण्यात आले आहे. त्यामुळे हजारो रुग्णांना शासनाकडून मिळणारी मदत बंद झाली आहे. रुग्णांच्या शस्त्रक्रिया तसेच इतर वैद्यकिय उपचार रखडले आहेत. त्यामुळे हा कक्ष लवकर सुरु करावा अशी मागणी केली जात आहे. 

क्रिकेट अन् राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत काहीही घडू शकते

दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यांना तातडीने मदत करण्यासाठी निधी तत्काळ वितरित करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी राज्यपालांकडे केली. लगेच कारवाई करण्याचे राज्यपालांन मान्य केले.‬ ‪मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून गरीब रुग्णांना दिलासा दिला जातो. या निधीचे संचालन राज्यपाल कार्यालयातर्फे करण्यात यावे. पण एकही गरजू रुग्ण मदतीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे, अशी विनंती त्यांनी राज्यपालांकडे केली. 

नव्या आघाडीत मुख्यमंत्री शिवसेनेचाच यावर शिक्कामोर्तब