पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कितीही डोके फोडले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहणार: संजय राऊत

संजय राऊत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नामनियुक्त विधान परिषद सदस्यतेबाबत राज्यपालांना जो निर्णय घ्यायचा आहे तो घेऊ द्या. पण घटना आणि कायद्याची चौकट कोणालाच मोडता येणार नाही. राजभवनाच्या भिंतीवर कितीही डोके फोडले तरी २७ मे नंतरही सरकार हेच राहील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहतील. हे वैभल्यग्रस्त विरोधी पक्षाने लक्षात ठेवावे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला खडसावले आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनातील रोखठोक या लेखातून त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. 

कोरोनाचे थैमान! जगभरात कोरोनाबळींची संख्या दोन लाखांवर

महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने ताळतंत्र सोडला आहे. राज्य संकटात असताना येथे अराजकाची आग लागावी अशी त्यांची इच्छा आहे. याकामी विरोधी पक्ष राज्यपाल या संस्थेला बदनाम करीत आहे, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पूर्वाश्रमीचे भाजपचे नेते आणि संघ प्रचारक आहेत. पण आज ते फक्त राज्यपाल आहेत. विरोधी पक्षाचे नेते राजभवनात उठसूठ जातात आणि राज्यपाल हे फक्त भाजपचेच नेते आहेत अशा आविर्भावात भेटतात. त्यामुळे राज्यपालांची प्रतिमा खराब होत आहे, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. 

कोविड-१९:राज्यात ८११ नवे रुग्ण, एका दिवसातील आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा

तसंच, राज्याच्या प्रश्नांबाबत विरोधी पक्षनेत्यांनी मुख्यमंत्र्याना भेटून त्यांचे मन मोकळे केले पाहिजे किंवा तक्रारी मांडल्या पाहिजेत. मात्र त्या राज्यपालांनाच सतत सांगणे, राज्यपालांच्या कानाशी लागणे कितपत योग्य आहे? असा सवाल त्यांनी केला आहे. आता विरोधी पक्षनेते राजभवनाचा परिसर सोडायला तयार नाहीत. राजभवनातील एखादे कॉटेज आता विरोधी पक्ष नेत्याचे अधिकृत निवासस्थान म्हणून जाहीर केले की झाले? विरोधी पक्ष स्वत:बरोबर राज्यपालांचे अध:पतन करीत आहे. राज्यपालांनी ते रोखावे, असे संजय राऊत यांनी सांगितले. 

कोविड -१९: देशात आतापर्यंत २० टक्के रुग्ण कोरोनामुक्त!

महाराष्ट्रात रिक्त होणाऱ्या विधान परिषदेच्या एखाद्या जागेवर मुख्यमंत्री सहज निवडून गेले असते. त्या निवडणुकीच्या तारखाही जाहीर झाल्या होत्या. पण कोरोनाच्या संकटामुळे देशभरातून सर्वच निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर दुसरा पर्याय उरला नाही. तेव्हा राज्यपाल नामनियुक्त रिक्त असलेल्या दोनपैकी एका जागेवर मुख्यमंत्र्यांची नेमणूक व्हावी अशी शिफारस राज्याच्या कॅबिनेटने केली. या शिफारशीला १५ दिवस उलटून गेले तरी राज्यपाल त्यावर स्वाक्षरी करीत नाहीत. शिवरायांच्या महाराष्ट्राचे भवितव्य खुंटीला टांगले आहे. हे सर्व महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावणारे आणि जनतेचा अपमान करणारे आहे, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले. 

मुंबई-पुण्यात १८ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो : राजेश टोपे