पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उद्धव ठाकरेंनी गोपीनाथ मुंडेंच्या समाधीस्थळाचं घेतलं दर्शन

उद्धव ठाकरे गोपीनाथ गडावर

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. नांदेडमध्ये ओल्या दुष्काळामुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी केल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी त्यांनी परळी येथे गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करुन गोपीनाथ मुंडे यांना श्रध्दांजली वाहिली.

युतीवर गिरीश महाजन म्हणाले, आपण हिंदुस्थान-पाकिस्तान नाही

दरम्यान, गोपीनाथ गडावर मोठ्यासंख्येने शिवसैनिकांनी आणि मुंडे समर्थकांनी गर्दी केली होती. याठिकाणी मुंडे कुटुंबियातील एकही सदस्य उपस्थित नव्हता. पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या दोघी बहिणी मुंबईमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर उध्दव ठाकरे बीड येथील माजलगाव येथे पावसामुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी करण्यासाठी रवाना झाले.

शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५० हजारांची मदत द्या: अजित पवार

दरम्यान, उद्धव ठाकरे गोपीनाथ गडावर येणार असल्याने गोपीनाथ गडावर मंगळवारी सकाळी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी रांगोळी काढण्यात आली. धनुष्यबाणावर कमळ अशा प्रकारची रांगोळी काढण्यात आली असून या रांगोळीच्या बाजूला आठवण साहेबांची असे देखील लिहिले आहे. त्यामुळे या रांगोळीवरुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. 

शिवसेनेच्या प्रस्तावासाठी दरवाजे २४ तास खुले : भाजप