पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ठरल्याप्रमाणे करा एवढाच प्रस्ताव - संजय राऊत

संजय राऊत

शिवसेना आता कोणताही नवा प्रस्ताव पाठवणार नाही आणि स्वीकारणारही नाही. युती करण्याआधी ठरल्याप्रमाणे करा, एवढाच आमचा प्रस्ताव आहे, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी बुधवारी सकाळी पत्रकारांना सांगितले. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या शिरस्त्याप्रमाणे बुधवारी सकाळीही संजय राऊत यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

भाजप-सेनेतील तिढ्याने संसद अधिवेशनाचा कार्यक्रम अनिश्चित

संजय राऊत म्हणाले, राज्यात केवळ सत्तास्थापन करणे हा एकच प्रश्न नाही. अन्यही अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मंगळवारी मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे सुद्धा महाराष्ट्रात फिरताहेत. आमचे दोन्ही नेते राज्यातील शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या भावना जाणून घेत आहेत. हा वर्गही शिवसेनेकडे आशेने पाहात आहे. जिथे जिथे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जाताहेत तिथे तिथे मुख्यमंत्री शिवसेनेचाच करा, असे त्यांना सांगितले जात आहे. शिवसेनाच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकते, याबद्दल त्यांच्या मनात विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले.

काळजीवाहू सरकारला महाराष्ट्राची काळजी नाही: बाळासाहेब थोरात

महाराष्ट्रात निवडणूक झाल्यानंतर आता राष्ट्रपती राजवट लागू केल्यास तो येथील जनतेवर अन्याय ठरेल, असेही संजय राऊत म्हणाले.