पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

घटनेच्या चौकटीत सरकार चालवू हे शिवसेनेकडून लिहून घेतले, अशोक चव्हाणांचा गौप्यस्फोट

अशोक चव्हाण

घटनाबाह्य काहीही काम करणार नाही. घटना सर्वोच्च मानून त्याच्या चौकटीतच सरकार चालवू हे शिवसेनेकडून लिहून घ्या, अशी सूचना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येण्याआधी केली होती. त्यानुसार शिवसेनेने लिहून दिल्यावरच आम्ही सत्तेत सहभागी झालो, असा गौप्यस्फोट राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला. नांदेडमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली. विविध वृत्तवाहिन्यांनी हे वृत्त प्रसारित केले आहे.

मला हिंदुहृदयसम्राट म्हणू नका; राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

अशोक चव्हाण म्हणाले, राज्यात सत्ता स्थापन करण्याआधी सोनिया गांधींनी प्रश्न विचारले होते. शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यावरूनचे हे प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावेळीच त्यांनी कोणतेही घटनाबाह्य काम करणार नाही हे शिवसेनेकडून लिहून घेण्याची सूचना केली होती. शिवसेनेने तसे लिहून दिल्यावरच आम्ही सत्तेत सहभागी झालो आहोत. जर घटनाबाह्य काहीही काम झाले तर आम्ही सत्तेतून बाहेर पडू, असेही अशोक चव्हाण यांनी सांगितले.

'जय मोदीचा नारा दिला तर पाकिस्तानींना सुद्धा पद्मश्री मिळेल'

दरम्यान, एबीपी माझा वाहिनीशी बोलताना नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेने सत्ता स्थापन करण्यापूर्वी असे काहीही लिहून दिलेले नसल्याचे स्पष्ट केले. घटनेच्या चौकटीतच महाविकास आघाडीचे सरकार काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:shivsena in written gave apporval to run the government on the line of constitution says ashok chavan