पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मनसेच्या शॅडो कॅबिनेटच्या निर्णयाचेच शिवसेनेकडून वाभाडे

शिवसेना

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या कामाचे वाभाडे काढण्यासाठी मनसेच्या शॅडो मंत्रिमंडळाच्या निर्णयाचेच शिवसेनेने बुधवारी वाभाडे काढले.   मनसेच्या शॅडो मंत्रिमंडळाच्या निर्णयावर शिवसेनेने कडाडून टीका केली. राज्यात १०५ आमदारवाल्यांनी शॅडो मंत्रिमंडळ तयार केले नाही. पण एकमेव आमदारवाल्यांनी शॅडो मंत्रिमंडळ तयार केले असे सांगत नाव न घेता मनसेवर टीका करण्यात आली.

पुणे : कोरोनाबाधित कुटुंबीयांच्या संपर्कात आलेल्या ४० जणांचा शोध सुरु

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तील अग्रलेखामधून मनसेच्या शॅडो मंत्रिमंडळ संकल्पनेचेच वाभाडे काढण्यात आले आहेत. अग्रलेखात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील किंवा देशातील सध्याच्या विरोधी पक्षाची स्थिती पाहता शॅडो मंत्रिमंडळाचा प्रयोग म्हणजे 'हा खेळ सावल्यांचा' नाट्यप्रयोग ठरू नये. लोकसभेत अधिकृत विरोधी पक्षनेताच नाही. राज्यात विरोधी पक्ष अद्याप बादशाही भूमिकेतून बाहेर पडायला तयार नाही. शॅडो मंत्रिमंडळाची घोषणा करताना त्यांच्या प्रमुख नेत्यांना छाया मंत्रिमंडळास तंबी द्यावी लागली की, जपून करा, ब्लॅकमेल करण्याचे प्रकार करू नका. हे बरे झाले. अनुभव माणसाला शहाणपणा शिकवतो, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

कोरोना: इटली, कोरियातून परतणाऱ्यांसाठी 'हा' नवा नियम

शॅडो मंत्रिमंडळ बनविण्यासाठी त्या संख्येने आमदार किंवा खासदार निवडून आणावे लागतात. तसे ते दिसत नाही. पुन्हा शॅडोवाल्यांचे मुख्यमंत्रीपद रिकामेच आहे. या शॅडो मंत्रिमंडळास शपथ देण्यासाठी एखादा शॅडो राज्यपाल नेमला असता तर योग्य ठरले असते, असाही टोमणा शिवसेनेने लगावला आहे.