पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यात शिवजयंतीचा उत्साह; राज्यपालांनी केले शिवरायांना अभिवादन

राज्यात शिवजयंतीचा उत्साह; राज्यपाल कोश्यारींनी केले शिवरायांना अभिवादन

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज (बुधवार) मुंबई येथील शिवाजी पार्क येथील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आदी उपस्थित होते.

शिवभोजन योजनेचा विस्तार, थाळीची संख्या दुप्पट

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवनेरीच्या विकासासाठी २३ कोटींचा निधी जाहीर केला. यावेळी त्यांच्याबरोबर कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. राज्यभरातून शिवप्रेमी शिवनेरी गडावर दाखल झाले आहेत. शिवनेरीचा परिसर 'जय भवानी, जय शिवाजी'च्या घोषणांना परिसर दणाणून गेला आहे. 

तर सोलापूर येथे मध्यरात्री १२ वाजता वीरमाता, वीरपत्नी, वीरकन्यांच्या हस्ते पाळणा झुलवत हजारो रणरागिणींनी एका सुरात शिवजन्मोत्सवाचा पाळणा म्हणत नवी स्फूर्ती निर्माण केली. श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाचा पाळणा गायन कार्यक्रमास शहरातील सर्व समाजाच्या, सर्व स्तरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

चीनचे ते जहाज पाकला निघाले होते, पण दिल्लीतून फोन आले

छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर पाळणा सोहळ्याची तयारी पूर्ण करण्यात आली होती. किल्ला बांधणीरूपी सजावट असलेल्या १२ फूट उंचीच्या स्टेजला विविधरंगी फुलांनी आकर्षक सजावट केलेली होती. पुतळ्याभोवती उभारलेला भगवा शामियाना व विद्युत रोषणाईने सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. रात्री आठपासून शिवरंजनीच्या कलावंतांनी 'शिवकल्याण राजा' या कार्यक्रमाद्वारे शिवगीते सादर करून सर्वांचे स्वागत करण्यास प्रारंभ केला.

कोरोनामुळे HSBC करणार ३५००० कर्मचाऱ्यांची कपात