पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमृता फडणवीस-शिवसेना वादविवादाचा सामना संपता संपेना

अमृता फडणवीस यांनी व्हिडिओ शेअर करत शिवसेनेवर सोडला आणखी एक टीकेचा बाण

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि शिवसेना यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. स्वतःच्या नावापुढे ठाकरे आडनाव वापरून कोणीही ठाकरे होत नाही. ठाकरे आडनाव वापरणाऱ्या व्यक्तीने तत्त्वनिष्ठा आणि सच्चेपणा दाखवला पाहिजे, असे ट्विट करत अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांच्या या ट्विटवर उद्धव ठाकरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी शिवसैनिक मात्र अमृता फडणवीस यांच्या ट्विटवर संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले.

नुसत्या आडनावाने कोणी ठाकरे होत नाही, अमृता फडणवीसांची टीका

अमृता फडणवीस यांच्या ट्विटचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या महिला आघाडीने जोडे मारो आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले. या आंदोलनाचा व्हिडिओ शेअर करत अमृता फडणवीसांनी पुन्हा एक ट्विट करुन शिवसेनेवर आणखी एक टीकेचा बाण सोडला आहे.  'लोकांच्या डोक्यावर मारून तुम्ही नेतृत्व करू शकत नाही..', अशा आशयाचे ट्विट करत अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा हल्ला केलाय. दिखाओ चप्पल, फेको पत्थर, ये तो शौक़ हैं पुराना आपका, हम तो वो शक़्स हैं की धुप में भी निखर आएँगे!' अशी शायरी लिहून त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 

अमृता फडणवीस अन् प्रियांका चतुर्वेदी यांच्यात जुंपली

अमृता फडणवीस आणि शिवसेना यांच्यातील वादाला औरंगाबादमधील शिवेसनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या उभारणीवरून वादाला सुरुवात झाली होती.  या स्मारकासाठी हजारो झाडांची कत्तल होणार असल्याची बातमी एका इंग्रजी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती. ही बातमी शेअर करत अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले होते. त्यांच्या या ट्विटला शिवसेनेच्या उपनेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी प्रत्त्युतर दिले होते. त्यानंतरही अमृता फडणवीस आणि शिवसेना यांच्यातील वाद सुरुच असल्याचे पाहायला मिळते. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: shiv sena workers play slippers on amruta fadnavis photo former cm wife shares video and target shiv sena