पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आता विरोधी पक्षनेतेपदाची प्रतिष्ठा राहावी हीच इच्छा, शिवसेनेचा टोला

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेनेने निशाणा साधला आहे. फडणवीस यांनी आता विरोधी पक्षनेतेपदाची तरी प्रतिष्ठा राखावी असा टोला त्यांनी लगावला आहे. विश्वासदर्शक ठरावाच्या प्रसंगी नवीन विरोधी पक्षनेत्यांनी जे ‘नाटय़’ केले ते बरोबर नव्हते. छत्रपती शिवरायांचे नाव मंत्र्यांनी शपथविधीत घेतले म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा जळफळाट झाला. शिवरायांचे स्मरण बेकायदेशीर ठरवणारे नियमांची भाषा करतात. बहुमत नसताना महाराष्ट्राला अंधारात ठेवून बेकायदेशीर पद्धतीने शपथ घेणारे मुख्यमंत्री व विधानसभेला सामोरे न जाणारे ८० तासांचे मुख्यमंत्री अशी आपली इतिहासात आता नोंद झाली आहे हे लक्षात घ्या, असे म्हणत ही नोंद पुसायची असेल तर विरोधी पक्षनेता म्हणून कायद्याने काम करा किंवा निदान एकनाथ खडसेंची पक्षांतर्गत शिकवणी लावा, असा सल्लादेखील दिला. 

मी येथे येईन असं कधीच म्हणालो नाही, तरीही मी आलो; CM ठाकरेंचा टोला

'सामना' या मुखपत्रातून शिवसेनेने फडणवीस यांच्यावर आगपाखड केली. पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात बंड करून खासदारकीचा राजीनामा देणारे पहिले भाजप क्रांतिवीर म्हणून नाना पटोले यांची नोंद आहे. विधानसभेत ते जिंकले व आता विधानसभेचे अध्यक्ष झाले. मोदी कुणाला बोलू देत नाहीत असे पटोले यांचे सांगणे होते. आता विधानसभेत फडणवीस यांनी बोलायचे की नाही हे नाना पटोले ठरवतील. विरोधी पक्षनेत्याने स्वतःची व पदाची प्रतिष्ठा राखली तर सर्व ठीक घडेल. आम्ही संसदीय लोकशाहीचा आदर करतो, तुम्हीही करा. हे सरकार पाच वर्षे टिकेल. हे सरकार कायदेशीर मार्गाने सत्तेवर आले आहे. 

पुलवामा हल्ल्यानंतर 'जैश'च्या दहशतवाद्यांचा दिल्लीवर होता निशाणा

काय म्हटलंय शिवसेनेने..
भाजपने बहुजन समाजाचा चेहरा गमावला आहे व जनता त्यांच्यापासून दूर गेली आहे. आज विरोधी पक्ष म्हणून जो आकडा त्यांच्या भोवती दिसत आहे, तो टिकवणे यापुढे अवघड जाईल असे वातावरण आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदानाने पार पाडली असती तर आम्ही जे सांगतो त्यावर मोहोर उठली असती. १७० चे बहुमत साधे नाही व उद्या हा आकडा १८५ पर्यंत पोहोचला तरी आश्चर्य वाटायला नको. 

'आरे'तील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणारः उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर जे घडले आहे व घडू पाहत आहे तो सर्व प्रकार म्हणजे भाजपचे ‘कर्मफळ’ आहे. महाराष्ट्रावर जोरजबरदस्तीचे अघोरी प्रयोग चालले नाहीत. दिल्लीच्या जारण-मारण मंत्राचा प्रभाव पडला नाही. ‘बोलबच्चनगिरी’ सत्तेवर असताना लोकांनी खपवून घेतली. आता ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर’ असे भाजपने पोसलेले मीडियावालेच बजावत आहेत.

खूशखबर!, नोव्हेंबरमध्ये जीएसटी संकलनात ६ टक्क्यांची वाढ