पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'महाराष्ट्रातील लहान भावाला पंतप्रधानांनी साथ द्या'

(छाया सौजन्य : AP)

महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप- शिवसेनेचं बिनसले आहे. पण पंतप्रधान नरेंद्र  मोदी आणि उद्धव ठाकरे यांचं नातं भावा- भावाचे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लहान भावाला पंतप्रधानांनी साथ द्या असं आवाहन शिवसेनेनं केलं आहे. 

 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही उद्धव ठाकरेंना शुभेच्छा  दिल्या. त्यानंतर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून सहाकार्य करण्याचे  आवाहन मोदींना करण्यात आलं आहे. 

'किल्ले रायगडसाठी २० कोटी मंजूर, बळीराजासाठी २ दिवसांत मोठी घोषणा करु'

'महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दु:खाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी केंद्रालाच सहकार्याचा हात पुढे करावा लागेल. महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप- शिवसेनेचं बिनसले आहे. पण नरेंद्र मोदी व उद्धव ठाकरे  यांच्यातील नाते  भावा- भावाचे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लहान भावाला पंतप्रधान म्हणून साथ देण्याची जबाबदारी मोदींची आहे. पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे असतात, एका पक्षाचे नसतात हे सूत्र ठेवले तर  जे आपल्या विचारांचे नाहीत त्यांच्या सरकारविषयी मनात राग लोभ का ठेवायचा? सरकारच्या स्थैर्याला चूड लागेल असे काही घडू नये याची काळजी घ्यावी', असं आवाहन करण्यात आलं आहे. 

देवेंद्र फडणवीस यांचा नव्या घरासाठी शोध सुरु

तर दुसरीकडे पूर्वीच्या फडणवीस सरकारवर टीका केली आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडीच्या पहिल्या कॅबिनेटची बैठक पार पडली. या बैठकीत अवकाळी पाऊस आणि दुष्काळाने हताश झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भाती मुद्दा केंद्रस्थानी होता. शेतकऱ्यांसाठी तुटपूंजी मदत करायची नाही. त्यांच्यासाठी  भव्यदिव्य करण्याचा विचार नाही तर निश्चय आहे. दोन दिवसांत आम्ही यासंदर्भात निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले.  मात्र दुसऱ्या दिवशी अग्रलेखातून फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडलं.  फडणवीस सरकारनं पाच वर्षांत पाच लाख कोटींचे कर्ज लादले आणि गेले, त्यामुळे नव्या मुख्यमंत्र्यांनी जे संकल्प योजले आहेत त्यावर वेगाने पण सावध पावले टाकावी लागतील असंही मुखपत्रात म्हटलं आहे. 

हे नातं असंच राहू दे, फडणवीसांचे राऊतांनी मानले आभार