पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महाराष्ट्रात साधूंची भगवी वस्त्र रक्ताने भिजली याचे राजकारण करु नका: शिवसेना

संजय राऊत (ANI)

पालघर परिसरात दोन साधूंची जमावाने निर्घृणपणे हत्या केली. या घटनेचा धिक्कार करावा तेवढा थोडाच आहे. हा सर्व प्रकार म्हणजे महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रकार असल्याचे उघड होऊ लागले आहे. काही मंडळींनी यालाही हिंदू-मुसलमान रंग देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. साधू मारले गेले हे त्यांचे दु:ख नसून साधू मारल्यावर पेटवापेटवीचे प्रयत्न अपयशी ठरले या दु:खाने ते तळमळत आहेत, अशी टीका शिवसेनेने 'सामना' या आपल्या मुखपत्रातून केली आहे. 

राष्ट्रपती भवनात कोरोनाचा रुग्ण, १२५ कुटुंब क्वारंटाईन

पालघरजवळ झालेल्या दोन साधूंच्या हत्येने महाराष्ट्राच्या परंपरेस हादरा बसला हे खरे. असा हादरा बसावा म्हणून कोणी हे सर्व घडवले नाही ना?, असा संशयही अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे. पण या घटनेतील गुन्हेगारांना कठोर शासन होईल आणि एकही आरोपी सुटणार नाही असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी दिला आहे. महाराष्ट्रात साधूंची भगवी वस्त्र रक्ताने भिजली याचे राजकारण कोणी करु नये, असे आवाहन अग्रलेखातून करण्यात आले आहे. 

किम जोंग उन यांची प्रकृती गंभीर, अमेरिकी माध्यमांचे वृत्त

साधूंची हत्या जितकी निषेधार्ह, साधूंचे रक्त सांडणे जितके निर्घृण आणि अमानुष तितकेच अमानुष या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचे कारस्थान आहे. साधूंवर हल्ला करणारे जितके नराधम आहेत तितकेच नराधम या प्रकरणाला जातीय आणि धार्मिक रंग देणारे आहेत, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे. या घटनेनंतर एका विशिष्ट विचारांच्या संस्था आणि संघटनेशी संबंधित लोक बोलू आणि लिहू लागले आहेत. हे सुद्धा खतरनाक आहे. काहींचा हिंदुत्ववाद या निमित्ताने उफाळून आला, पण या उफाळणाऱ्या उकाळ्यांनी एक लक्षात घेतले पाहिजे, ज्या गडचिंचले गावात ही दुर्घटना घडली त्या गावातील ग्रामपंचायत गेली १० वर्षे भाजपच्या ताब्यात आहे. सरपंच भाजपचाच आहे. म्हणजे मारहाण करणाऱ्यांचा रंग कोणता, हे सांगायला नको, अशी टीका सामनातून भाजपवर करण्यात आली आहे. 

नियमावलीनंतरच मद्यविक्रीबाबतचा अंतिम निर्णय- आरोग्यमंत्री

अनेक राजकीय भक्त मंडळींचे दु:ख असे की, महाराष्ट्रात दोन साधूंची हत्या झाली, समाज माध्यमांवर धार्मिक भेदाभेदीचे विष पेरले गेले तरीही महाराष्ट्रात धार्मिक उन्माद उसळला कसा नाही? त्यामुळे अनेकांना वैफल्य येणे साहजिकच आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांच्या राज्यात हिंदू साधूंची हत्या होते यावर काहींनी चिंता व्यक्त केली आहे. या चिंतेमागचे खरे कारण वेगळेच आहे. विरोधी पक्षनेत्यांनीही समाज माध्यमांवर या घटनेवरुन अश्रूंचा पूर वाहिला. पण आधी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात धुळ्यात पाच आणि चंद्रपूरात एका हिंदू गोसाव्याची जमावाने अशीच निर्घृण हत्या केली होती. तेव्हा हा हिंदुहृदयसम्राटांचा महाराष्ट्र नव्हता काय?, असा सवाल अग्रलेखातून करण्यात आला आहे.

मुंबईत या व्यक्तींना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन नाही- आरोग्यमंत्री