पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राम मंदिर ट्रस्टसाठी शिवसेना आमदाराचे मोदींना पत्र

प्रताप सरनाईक आणि नरेंद्र मोदी

अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीसाठी केंद्र सरकारकडून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास (ट्रस्ट)ची स्थापन करण्यात आली आहे. या ट्रस्टमध्ये शिवसेनेचा किमान एक सदस्य असावा, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. ट्रस्टसाठी शिवसेनेच्या सदस्याच्या नावाची शिफारस करावी, अशी विनंती त्यांनी मोदींना केली आहे.  

'मुनगंटीवार के हसीन सपने' पुस्तकाची प्रस्तावना मीच लिहीन : राऊत

अयोध्येत राम मंदिर उभारण्याच्या संघर्षात दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे योगदान आहे. हे लक्षात घेऊन शिवसेनेच्या सदस्याला ट्रस्टमध्ये स्थान मिळावे, असा उल्लेख प्रताप सरनाईक यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रामध्ये केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला होता. न्यायालयाच्या निर्णयानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 'श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र' या ट्रस्टच्या स्थापनेला मंजुरी देण्यात आली होती.

Maharashtra Budget: आमदारांचा विकासनिधी २ वरुन ३ कोटींवर

ट्रस्टची स्थापना झाल्यानंतर पहिल्या बैठकीत महंत नृत्य गोपाल दास यांची ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. तर, विश्व हिंदू परिषदेचे चंपत राय यांची सरचिटणीस म्हणून निवड झाली आहे. खजिनदारपदी स्वामी गोविंद देवगिरी यांची निवड केली गेली आहे. भवन निर्माण समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पंतप्रधान मोदींचे माजी प्रधान सचिव नृपेंद मिश्रा यांना देण्यात आली आहे. यात १५ सदस्यांचा समावेश असणार आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Shiv Sena MLA Pratap Sarnaik has written a letter to Prime Minister Narendra Modi saying to nominate at least one Shiv Sena member as trustee of Ram Mandir Trust