पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नेटफ्लिक्सवरून हिंदूंची आणि भारताची बदनामी, शिवसेना पदाधिकाऱ्याची पोलिसांत तक्रार

नेटफ्लिक्स

नेटफ्लिक्स आपल्या ऍपच्या माध्यमातून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांतून हिंदूंची आणि भारताची बदनामी करीत असल्याचा आरोप करीत शिवसेनेच्या माहिती-तंत्रज्ञान (आयटी) विभागाचे सदस्य रमेश सोळंकी यांनी याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

विसर्जन मिरवणुकीत सलमानचा हटके डान्स!, व्हिडिओ व्हायरल

मुंबईतील एलटी मार्ग पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीमध्ये रमेश सोळंकी यांनी म्हटले आहे की, सेक्रेड गेम्स, लैला, घौल या मालिकांमधून तसेच इतही कार्यक्रमांमधून हिंदूंच्या आणि भारतीयांच्या भावना दुखावणारे चित्रण प्रसारित केले जाते. त्याचबरोबर हिंदूंचे चुकीच्या पद्धतीने चित्रण केले जाते.

नेटफ्लिक्सवर प्रसारित होणारी जवळपास प्रत्येक मालिका जागतिक पातळीवर भारताची बदनामी करणारीच आहे. या माध्यमातून देशाचे चुकीच्या पद्धतीने चित्रीकरण केले जात आहे, असेही सोळंकी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकरांवर केलेल्या आरोप प्रकरणाला नवे वळण

पोलिसांनी नेटफ्लिक्सवरील सर्व मालिका आणि इतर मजकूर बघून घ्यावा आणि त्यानंतर संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पोलिसांकडे केलेल्या तक्रारीची एक प्रत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही पाठविण्यात आली आहे.