पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मी बेळगावला येतोय, पाहू काय घडतंयः संजय राऊत

संजय राऊत

सीमालढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगाव येथे गेलेले आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-येड्रावकर यांना शुक्रवारी कर्नाटक पोलिसांनी धक्काबुक्की केली होती. त्याचा शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी निषेध केला असून ते स्वतः शनिवारी बेळगावला जाणार आहेत. मी बेळगावला जात आहे. पाहू काय घडतंय. मी खासदार आहे, या देशाचा नागरिक आहे. मला रोखायचे असेल तर कायद्याने रोखा, असा सज्जड इशारा राऊत यांनी कर्नाटक सरकारला दिला आहे. तसेच महाराष्ट्र भाजप कर्नाटकच्या दहशतवादाचा साधा निषेध तरी करेल काय, असा सवाल विचारला आहे. 

संजय राऊत यांनी टि्वट करत बेळगावला जाणार असल्याचे जाहीर केले. ते म्हणाले, महाराष्ट्राचे मंत्री राजेंद्र येड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी धक्काबुक्की केली. हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यापासून रोखले. महाराष्ट्र भाजपा या कर्नाटकी दहशतवादाचा साधा निषेध तरी करेल काय?, असा सवालही केला. 

हिंदू अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या मुद्यावरुन भारताने पाकला सुनावले

दरम्यान, बेळगावमधील हुतात्मा चौकात महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेच्या वतीने हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पचक्र, पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. अभिवादनानंतर कार्यकर्त्यांनी शहरातील प्रमुख मार्गावरुन फेरी काढली.

जुन्या मित्रांच्या चांगल्या गोष्टींवर घाव घालणार नाही : CM ठाकरे