पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'उद्धव ठाकरे- राज ठाकरे यांच्यात राजकीय मतभेद, कौटुंबिक नातं आजही कायम'

संजय राऊत (ANI)

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये राजकीय मतभेद आहेत. मात्र त्यांच्यातील कौटुंबिक नातं अजूनही कायम आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. बेळगावातील गोगटे रंगमंदिरमध्ये झालेल्या प्रकट मुलाखतीमध्ये संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नात्यावर बोलताना ही प्रतिक्रिया दिली. दरम्यान, बेळगावात मराठी भाषेची मशाल पेटली आहे. देशामध्ये भाषे-भाषेचा वाद असू नये. याठिकाणी भाषेचा आणि संस्कृतीचा वाद आहे. मात्र न्यायालयाच्या मार्गाने यावर निर्णय होईले, असे देखील त्यांनी सांगितले. 

'डॉ. आंबेडकर स्मारकाला माझा विरोध, तो निधी वाडिया रुग्णालयाला द्या'

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नात्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत यांनी सांगितले की, 'उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघे भाऊ आहेत. हे कोणी नाकारु शकत नाही. दोघे ही ठाकरे आहेत. हे सुध्दा खरे आहे. दोन्ही भावांनी कोणत्याही व्यासपीठावरुन एकमेकांवर कधीही व्यक्तिगत टीका केली नाही. कुटुंब म्हणून भाऊ म्हणून दोघे एक आहेत. दोघांमध्ये राजकीय मतभेद आहेत. मात्र दोघांमध्ये कौटुंबिक नातं अजुनही कायम आहे, असे त्यांनी सांगितले. 

'मेगाभरतीचा निर्णय कोअर कमिटीचा, माझ्या एकट्याचा नाही'

दरम्यान, 'हे युध्द कौरव पांडवांचे आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी सीमाप्रश्नी दिली आहे. भाषा वाद जरी झाला असला तरी भाषेचा वाद असू नये, कारण आपला देश एकच आहे. कानडी बांधव महाराष्ट्रात जिथे जिथे राहतात तिथे कानडी शाळांना अनुदान देण्याचे काम आमचं सरकार करत आहे, असे देखील त्यांनी सांगितले. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी आजही आम्ही शुध्द मराठीतच बोलतो, असे त्यांनी सांगितले.  

'...तर राहुल गांधींना सर्वात आधी अंदमानच्या तुरुंगात पाठवावे लागेल'

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:shiv sena leader sanjay raut says uddhav thackeray and raj thackeray have political differences