पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या कारने शेतकऱ्याला चिरडले, जागीच मृत्यू

शिवसेना नेते आणि जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या कारच्या धडकेत एका युवकाचा मृत्यू झाला आहे.

शिवसेना नेते आणि जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या कारच्या धडकेत एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना बार्शी (जि. सोलापूर) तालुक्यातील शेलगाव येथे घडली. संतप्त जमावाने सावंत यांच्या गाडीची तोडफोड केली. शामकुमार देविदास व्हळे (वय ४०, रा. शेलगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफ्फुल पटेल यांच्या वाहन ताफ्यातील पोलिसांच्या एका गाडीला सोमवारी पहाटे अपघात झाला. यात एक पोलिस अधिकारी आणि हवालदार जखमी झाल्याचे सांगण्यात येते. नागपूर जिल्ह्यातील कडोळी गावाजवळ पहाटे ही घटना घडली.

युतीपूर्वीच शिवसेनेकडून विद्यमान आमदारांना एबी फॉर्मचे वाटप

शाम व्हळे हे आपल्या दुचाकीवरुन बार्शीत भाजी विकुन गावी परतत (एमएच १३ एक्यू २७८२) होते. त्यावेळी बार्शी-लातूर बायपास रस्त्यावर बीआयटी कॉलेजनजीक शेलगाव फाट्यावर भरधाव असलेल्या फॉर्च्युनरने व्हळे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात व्हळे यांचा जागीच मृत्यू झाला. संतप्त जमावाने कारची तोडफोड केली. यावेळी या कारमध्ये पुतणे आणि चालक असल्याचे तानाजी सावंत यांनी माध्यमप्रतिनिधींना फोनवरुन सांगितले. कार आपल्या नावावरच असून एकत्रित कुटुंब असल्याने पुतण्याने ती नेली होती, असेही सावंत यांनी म्हटले आहे. 

भारताला बुद्ध नव्हे संभाजी महाराज पाहिजेतः संभाजी भिडे

विशेष म्हणजे अपघातानंतर सावंत यांच्या कार्यकर्त्यांकडून कारची नंबर प्लेट काढून ठेवल्याचे सांगण्यात येते. पण कारमधील कागदपत्रामुळे सर्व माहिती समोर आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून शाम व्हळे यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजीकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:shiv sena leader minister tanaji sawants car dash to youth bike one dead at barshi solapur