पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बाळासाहेबांना धोका देणाऱ्याचा सत्यानाश होतो, गुलाबराव पाटलांचा राज ठाकरेंवर निशाणा

गुलाबराव पाटील आणि राज ठाकरे

राज्याचे नवनियुक्त पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांना आतापर्यंत ज्यांनी धोका दिला त्यांचा सत्यानाश झाला आहे. ठाकरे आडनाव नसते तर राज हे एक संगीतकार झाले असते, असा टोलाही त्यांनी लगावला. गुलाबराव पाटील हे नाशिक येथे एका प्रचारसभेत बोलत होते. 

नवा वाद! उच्च शिक्षण मंत्री सामंतही ज्ञानेश्वर विद्यापीठाचे विद्यार्थी

मनसे नावाचा पक्ष जळगाव जिल्ह्यात कुठे दिसत नसल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक प्रचारत गुलाबराव पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला होता. 

तत्पूर्वी, त्यांनी अब्दुल सत्तार यांच्याविषयीही भाष्य केले. अब्दुल सत्तार हे निवडणुकीपुर्वी शिवसेनेत आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना मंत्रिपदाची संधी दिली. शिवसेनेत दिवाकर रावते, रामदास कदम यांच्यासारख्या जेष्ठ नेत्यांऐवजी सत्तारांना संधी मिळत असेल तर त्यांनी नाराज होण्याची काहीही गरज नाही. त्यांनी समाधानी राहायला हवे, असे म्हटले. 

कुशल बेजबाबदार वडील होता, आत्महत्येनंतर पत्नीचा आरोप

दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय उलथापालथ झाली आणि शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाआघाडीचे सरकार सत्तेवर आले. तर इतक्या दिवस भाजप आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारे राज ठाकरे हे बदलत्या राजकीय समीकरणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे बोलले जात आहे. लवकरच मनसे आपल्या पक्षाचा झेंडा बदलणार असून भगवा किंवा केशरी रंगाचा त्यात समावेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्याचबरोबर भाजपशी ते 'दोस्ताना' करणार असल्याचेही सांगितले जात आहे.  

तरुणीला 'क्या माल लग रही है... मेरे साथ सोने चल' म्हणाला आणि पुढे...

भाजपलाही शिवसेनेसारखा जुना मित्रपक्ष दूर गेल्यामुळे नवा मित्र हवा आहे. त्यामुळे त्यांच्याकडून मनसेशी हातमिळवणी करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात येते.