पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे

डॉ. नीलम गोऱ्हे

विधान परिषदेच्या सभापतीपदाच्या निवडणुकीतून ऐनवेळी माघार घेतलेल्या शिवसेनेला विधानसभेचे उपसभापतीपद मिळाले आहे. शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांची सोमवारी उपसभापतीपदी निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. जोगेंद्र कवाडे यांनी या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषीत करण्यात आले. त्या विधानपरिषदेच्या पहिल्या महिला उपसभापती ठरल्या आहेत. 

काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांचा १७ जुलै २०१८ रोजी उपसभापतीपदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यापासून हे पद रिक्त होते. काँग्रेसने या पदावर दावा केला होता. पण त्यांनी माघार घेतल्यामुळे सेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाला.  

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून प्रभावीपणे काम पाहिले आहे. तसेच राज्यातील महिलांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांनी राज्य सरकारच्या विशेष हक्क समितीचे अध्यक्षपदही भूषवले आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Shiv Sena leader Dr Neelam Gorhe has been elected unopposed as Deputy Chairperson of state legislative council