पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अहमदाबादमध्ये 'नमस्ते' आणि दिल्लीत आगडोंब, सेनेचा मोदी सरकारवर निशाणा

डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

सीएए आणि एनआरसीवरुन ईशान्य दिल्लीत हिंसाचार सुरु आहे. यावरुन एकेकाळचा एनडीएचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेने मोदीसरकारवर निशाणा साधला आहे. सीएए समर्थक आणि विरोधक, दोन्ही बाजूने हल्ले झाले. पोलिसांवरील हल्ले चिंताजनक आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे दिल्लीतील स्वागत दंगलीच्या आगडोंबाने, रस्त्यावरील रक्ताच्या सड्याने, किंकाळ्या, अश्रुधुरांच्या नळकाड्यांनी झाले, हे बरोबर नाही, अशी खंत व्यक्त केली. ज्या हिमतीने काश्मिरात ३७०, ‘३५ अ’ सारखी कलमे हटवण्यात आली, त्याच हिमतीने दिल्लीतील दंगलीवरही नियंत्रण मिळवायला हरकत नव्हती, असा टोलाही लगावला. ट्रम्पसाहेब हे प्रेमाचा संदेश घेऊन दिल्लीत आले, पण त्यांच्या समोर हे काय घडले?, असा सवाल करत अहमदाबादमध्ये ‘नमस्ते’ आणि दिल्लीत आगडोंब! दिल्लीची इतकी बदनामी याआधी कधीच झाली नव्हती, असे शिवसेनेने म्हटले.

७२ कोटींचा बँक घोटाळा; राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसलेंसह चौघांना अटक

पक्षाचे मुखपत्र 'सामना'तून शिवसेनेने भाजपवर टीकास्त्र सोडले. या दंगलीचा फायदा समाजकंटक व देशविरोधी घटक घेत आहेत व ट्रम्प यांच्या दौऱ्यादरम्यान असा हिंसाचार घडावा आणि त्यातून देशाची प्रतिमा मलीन व्हावी यासाठी दंगलीचे कारस्थान रचले आहे असे गृहमंत्रालय म्हणत आहे, पण असे कारस्थान रचले व शिजले हे गृहमंत्रालयास समजू नये हे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याची चिंता व्यक्त केली. 

दिल्ली हिंसाचारः अजित डोवाल यांचा मध्यरात्री आढावा दौरा

काय म्हटलंय शिवसेनेने...
पंतप्रधान मोदी व ट्रम्पसाहेब यांच्यात चर्चा सुरू असताना शहर जळत होते. दंगलीमागची कारणे काहीही असोत, पण देशाच्या राजधानीतील कायदा आणि सुव्यवस्था राखायला केंद्र सरकार अपयशी ठरले आहे असा गदारोळ उठू शकतो. १९८४ सालचा शीखविरोधी दंगलीचा ठपका आजही काँग्रेसवर ठेवला जातो. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीत शीख समुदायास लक्ष्य करण्यात आले व त्यात शेकडो शीख बांधवांचे बळी गेले. त्यास काँग्रेस पक्ष जबाबदार असल्याची ओरड इतक्या वर्षांनंतरही भाजपचे लोक करीत आहेत. दिल्लीत सध्या हिंसाचाराचा उद्रेक झाला आहे, लोक रस्त्यांवर काठय़ा, तलवारी, रिव्हॉल्व्हर घेऊन उतरले आहेत, रक्ताचे सडे पडत आहेत. एखाद्या भयपटाचे चित्र सध्या दिल्लीत दिसत आहे, ते १९८४ च्या दंगलीचीच भयाण वास्तवता दाखवणारे आहे. दिल्लीतील सध्याच्या दंगलीस जबाबदार कोण? हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. दिल्ली विधानसभा निवडणूक आटोपल्यावर हिंसाचार उसळला आहे हे रहस्यमय आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला व आता दिल्लीची ही अशी दशा झाली आहे.

दिल्ली पेटवण्यामागे काँग्रेसचा हात, रामदास आठवलेंचा आरोप

दिल्लीतील शाहिनबाग परिसरात सीएएविरोधात लोक अनेक दिवसांपासून रस्ता अडवून बसले आहेत. हे आंदोलन संपावे म्हणून सर्वोच्च न्यायालयाने मध्यस्थ नेमले तरीही आंदोलन संपत नाही. भाजपच्या काही नेत्यांनी इशारे, धमक्यांची भाषा केली व तिथेच ठिणगी पडली असे सांगितले जाते. म्हणजे शांतपणे चाललेले हे आंदोलन भडकावे व त्याचे पर्यावसान आज भडकलेल्या दंगलीत व्हावे अशी कुणाची इच्छा होती काय? निदान ट्रम्प परत जाईपर्यंत तरी संयम राखायला हवा होता.

धगधगत्या दिल्लीची जबाबदारी या अधिकाऱ्याकडे