पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'कागदी घोडे नाचवू नका, हेक्टरी २५ हजार शेतकऱ्यांच्या हातात द्या'

उद्धव ठाकरे

ओल्या दुष्काळाने बेजार झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळायला हवी, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांना मदतीची नाही तर हक्क मिळवून देण्याचीही वेळ आहे. कागदी घोडे न नाचवता सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार थेट हातात द्यावे, असे त्यांनी म्हटले. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उद्धव ठाकरे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.   

विमा नसलेल्यांनाही मदत मिळणारः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यासह केंद्र सरकारनेही शेतकऱ्यांसाठीचे आपले कर्त्यव्य पार पाडायला हवे, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. अवकाळीग्रस्तांसाठी राज्य सरकारने १० हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. ही मदत पुरेसी नाही. १५ दिवसांत शेतकऱ्याला पुढील मोसमाची तयारी करायची आहे. त्याला बी- बियाणे खरेदी करावी लागले. नुकसान पाहणीचे सरकारच्या पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. केवळ प्रशासकिय यंत्रणेवर अवलंबून राहून चालणार नाही. त्यामुळे शिवसैनिकांना शेतकऱ्यांच्या घराघरापर्यंत पोहचून नुकसानीची माहिती घेण्यास सांगितल्याचे ते म्हणाले.   

शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार, शिवतीर्थावर शपथ घेणारः राऊत

यावेळी त्यांनी पिक विमा कंपन्या आणि बँकांनाही इशारा दिला. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीतून बँकांनी जुन्या कर्जाची वसूली करु नये, असेही उद्धव ठाकरे यांनी सुनावले आहे.