पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भास्कर जाधवांची समजूत काढण्यासाठी उदय सामंत चिपळूणला

उदय सामंत आणि भास्कर जाधव

मंत्रिपद न मिळाल्याने गुहागरचे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव हे नाराज आहेत. त्यांची समजूत काढण्यासाठी उच्च तंत्रज्ञान व शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. सोमवारी सकाळी सामंत यांनी जाधव यांचे निवासस्थान गाठून सुमारे एक तासाहून अधिक काळ त्यांच्याशी चर्चा केली. परंतु, उदय सामंत यांनी मात्र आपण जाधव यांची सदिच्छा भेट घ्यायला गेल्याचे सांगितले. 

'जेएनयूतील हल्ल्याने २६/११ची आठवण करुन दिली'

भास्कर जाधव हे ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आले होते. जाधव हे मुळचे शिवसेनेचेच नेते आहेत. उद्धव ठाकरे यांच्याविषयी नाराज होत त्यांनी शिवसेना सोडत राष्ट्रवादीची कास हातात धरली होती. राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळातही ते होते. त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपदही सांभाळले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते शिवसेनेत डेरेदाखल झाले होते. दोन दिवसांपूर्वी झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातही भास्कर जाधव यांनी सत्ता माझी असली तरी मी सत्तेत नाही, असे वक्तव्य केले होते. 

देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते, अनिल गोटेंची टीका

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेवेळी माध्यमांना ते सामोरे जात होते. पक्षाची भूमिका मांडतानाही ते दिसले होते. ज्येष्ठत्वामुळे त्यांना मंत्रिपद मिळेल अशी आशा होती. परंतु, मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना स्थान मिळाले नव्हते. त्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर आपली नाराजीही बोलून दाखवली होती. 

'बाळासाहेब ठाकरेंना धोका देणाऱ्याचा सत्यानाश होतो'

मी कोणावर नाही स्वतःवरच नाराज आहे. गेल्या ३५ वर्षांपासून मी राजकारणात आहे. सहावेळा आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, प्रदेशाध्यक्ष राहिलो. मी राजकारणात नवा नाही, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली होती. माझे नाव मंत्रिमंडळ विस्तारात न आल्याने मलाही आश्चर्याचा धक्का बसला. याबाबत मला पक्षप्रमुखांकडून समजून घ्यायचे आहे. मी कुठे कमी पडलो. माझी निष्ठा कुठे कमी पडली, हे मला जाणून घ्यायचे आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्याचा मला अभिमान आहे, हे सांगण्यासही ते विसरले नव्हते.

'सरकारने सरसकट कर्जमाफी नाही तर सरसकट धोकेबाजी केली'

त्यामुळे पक्षाकडून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगण्यात येते. सामंत-जाधव भेट यासाठी झाली असल्याचेही बोलले जाते. पण सामंत यांनी मात्र जाधव हे वरिष्ठ नेते आहेत. त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आल्याचे माध्यमांना म्हटले.