पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

३६५ दिवस शिवजयंती साजरी केली पाहिजेः राज ठाकरे

राज ठाकरे

हिंदू धर्माचे सण हे तारखेनुसार नव्हे तर तिथीनुसार साजरे केले जातात. ही आपल्या महापुरुषाची जयंती आहे. ती सणासारखी साजरा व्हायला हवी. शिवजयंती ही ३६५ दिवस साजरी केली पाहिजे, असे वक्तव्य मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले. ते औरंगाबाद येथे बोलत होते. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या वतीने यंदा औरंगाबादमध्ये शिवजयंती साजरी केली जात आहे.

लोकांना घाबरवत का आहात, राज ठाकरेंचा सवाल

राज ठाकरे पुढे म्हणाले की, हिंदू धर्माचा कुठलाच सण तारखेनुसार होत नाही. तिथीनुसारच ते साजरे केले जातात. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सणासारखी साजरी व्हायला हवी. 

आपल्याकडे आधीच इतकी रोगराई आहे. त्यात आणखी एकाची भर पडली, अशी प्रतिक्रिया त्यांनी कोरोना विषाणूवर दिली. त्याचबरोबर औरंगाबादमध्ये शांततेत शोभा यात्रा काढण्याचे आवाहन केले. 

राज्यसभा निवडणूक : भाजपकडून तिसऱ्या जागेसाठी डॉ. भागवत कराड यांना उमेदवारी

तत्पूर्वी, बुधवारी माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रशासनावर टीका केली होती. कोरोना विषाणूमुळे औरंगाबाद महापालिकेची निवडणूक पुढे ढकलणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आपल्याकडे अद्याप त्याची तीव्रता नाही. 'पॅनिक' करण्यासारखे राज्यात घडलेले नाही. लोकांना का घाबरवत आहात, असा सवाल राज ठाकरे यांनी प्रशासनाला केला आहे.

कोरोना विषाणू इफेक्ट; अर्थसंकल्पीय अधिवेशन शनिवारपर्यंतच

कोरोना विषाणूच्या पार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत पोलिसांनी मनसेच्या कार्यक्रमांना परवानगी दिलेली नाही. तरीही मनसेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार असल्याचे बोलले जात आहे.