पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लघुशंकेच्या वादातून शिर्डीत तीन जणांची कोयत्याने हत्या

शिर्डी तिहेरी हत्या

शिर्डी तिहेरी हत्याकांडाने हादरली आहे. आज सकाळी शिर्डीच्या निमगाव शिवारामध्ये तीन जणांची कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आली आहे. तर या हल्ल्यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सद्या शिर्डी संस्थान रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

उत्तर प्रदेशमध्ये पावसाचा कहर; १५ जणांचा मृत्यू तर १३३ 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, निमगाव शिवारात मंगेश कातोरे यांच्या वस्तीवर  राहणाऱ्या ठाकूर कुटुंबीयांची हत्या करण्यात आली आहे. ही हत्या त्यांच्या शेजारी राहणार्या अर्जुन पन्हाळे याने केली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपीच्या घराच्या दारावर सकाळी कोणीतरी लघुशंका केली होती. तसंच आरोपी आणि शेजारी राहणारे ठाकूर कुटुंबियांची नेहमी किरकोळ कारणावरुन वाद व्हायचे. ठाकूर कुटुंबातील कोणी तरी लघुशंका केल्याच्या संशयावरुन अर्जुन पन्हाळे याने रागाच्या भरात त्यांच्या घरामध्ये घुसून कोयत्याने वार करुन ३ जणांची हत्या केली.

गोव्यात मंत्रीमंडळ पुनर्रचना; ४ नव्या आमदारांचा होणार 

आरोपी अर्जुन पन्हाळेने ठाकूर पती-पत्नी यांची गळा चिरला. तर त्यांची सोळा वर्षाची मुलगी ही शाळेची तयारी करत होती. आरोपीने तिच्यावर देखील वार करुन केले. दरम्यान, या घटनेमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. जखमींवर साईबाबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोघांची प्रकृती देखील गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तर ठाकूर कुटुंबातील एक सहा वर्षांची चिमुकली बचावली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी शेजारीच असलेल्या एका खोलीमध्ये बसून होता. त्याला पोलिसांनी अटक केली. या घटनेमुले निमगाव परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. 

चंदनपूरी घाटात दरड कोसळली; नाशिक- पुणे महामार्गावरील वाहतूक