पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

CM उद्धव ठाकरे यांच्या विनंतीनंतर बेमुदत शिर्डी बंद मागे

शिर्डी बंद मागे

साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादातून पुकारण्यात आलेला बेमुदत शिर्डी बंद मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रश्नी सकारात्मक चर्चेचे आश्वासन दिल्यानंतर शिर्डीच्या ग्रामस्थांनी बंद मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री सोमवारी मुंबईत शिर्डी आणि पाथरीकरांसोबत चर्चा करणार आहेत.  

साईबाबांच्या जन्मस्थळाचा वादः मंदिर सुरु मात्र शिर्डीत कडकडीत बंद

परभणीतील पाथरीचा साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून विकास करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर वादाला तोंड फुटले. या निर्णयानंतर शिर्डीकरांनी बेमुदत बंदचे आवाहन केले. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक तोडगा काढण्यासाठी चर्चेचे निमंत्रण दिल्यानंतर ग्रामस्थानी बंद मागे घेतला आहे. मुख्यमत्री उद्धव ठाकरे साईभक्त आहेत. त्यांनी आम्हाला चर्चेसाठी बोलावले आहे. या बैठकीत निश्चितच सकारात्मक चर्चा होईल, अशी भावना ग्रामस्थांनी बोलून दाखवली आहे.

'उद्धव ठाकरे- राज ठाकरे यांच्यात राजकीय मतभेद, कौटुंबिक नातं आजही कायम'

श्री साईबाबा यांच्या जन्मस्थळावरून सुरु असलेल्या वादासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व संबंधितांशी सोमवारी मंत्रालयात बैठक घेऊन चर्चा करणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विट अकाउंटवरुन देखील देण्यात आली आहे.  देशात अनेक वाद चिघळलेले असताना साईबाबांचे जन्मस्थळ शिर्डी की पाथरी हा वाद उकरून काढला जात आहे. शिर्डी बंद ठेवून  हा प्रश्न सुटणार नाही.  शांततेच्या मार्गाने चर्चा करून हा प्रश्न सोडवण्याची गरज असल्याचे मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले होते. साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद खुद्द साईबाबांना आवडणार नाही.  या मुद्यावर राजकारण करू नये, असा टोलाही भुजबळ यांनी अप्रत्यक्षपणे भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना लगावला होता.