पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'...तर शरद पवारांच्या रुपात मराठी माणूस पंतप्रधान होईल'

शरद पवार

राज्यातील महाआघाडी सरकारचा दाखला देत युवा आमदार रोहित पवार यांनी अजोबा आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अजूनही पंतप्रधानांच्या शर्यतीत असल्याचे बोलून दाखवले आहे. साहेब अजूनही तरुण आहेत. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. हीच ऐकी कायम ठेवून आगामी लोकसभा निवडणूक लढलो तर २०२४ ला  मराठी माणूस पंतप्रधान पदावर बसल्याचे पाहायला मिळेल, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. औरंगाबाद येथील कार्यक्रमात त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. 

मोदींनी प्रसिद्धीसाठी ५ हजार २०० कोटी उधळले: प्रियांका गांधी

राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर राजकारणात अनपेक्षित बदल झाल्याचे पाहायला मिळाले होते. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येतील असे कधीही वाटले नव्हते. पण महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर राजकारणात एक नवे समीकरण पाहायला मिळाले होते. याचाच दाखला देत रोहित पवारांनी मराठी माणूस पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसू शकतो, असे म्हटले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या रुपाने मराठी माणूस पंतप्रधान होऊ शकतो याबाबत अनेकदा चर्चाही रंगल्या. मात्र प्रत्यक्षात हे चित्र दिसले नाही. सध्याच्या घडीला शरद पवारांसंर्भात रंगणारी ही चर्चा राष्ट्रपती होण्याच्या दिशेने रंगत असताना  शरद पवारांना पंतप्रधान पदी विराजमान व्हावे, अशी इच्छा रोहित पवारांनी बोलून दाखवली आहे.  

महात्मा गांधींच्या नावाचा उल्लेख केलाच नाही : अनंतकुमार हेगडे

राजकीय इतिहास पाहिला तर १९९१ मध्ये राजीव गांधी यांच्या हत्येनंतर शरद पवार यांचे नाव पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आले होते. मात्र गांधी कुटुंबियांच्या राजकारणात शरद पवार यांचे नाव मागे पडले आणि पी.व्ही. नरसिंहराव यांना पंतप्रधान होण्याची संधी मिळाली. नंरसिंह राव यांच्या तुलनेत शरद पवार यांचे वय खूप कमी असल्याचा दाखला यावेळी देण्यात आला होता. त्यानंतर शरद पवारांचा पंतप्रधानपदी विराजमान होण्याची संधी कधीच आली नाही. काँग्रेसमधून बाहेर पडून शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापन केल्यानंतर काँग्रेससोबत आघाडी करुन त्यांनी केंद्रीय कृषीमंत्री होण्यापर्यंत मजल मारल्याचे पाहायला मिळाले होते.