भीमा-कोरेगाव आणि एल्गार परिषदेचा संबंध नाही. एल्गार परिषद प्रकरणी पोलिस दलाने ज्या पध्दतीने सत्तेचा गैरवापर केला याचा तपास झाला पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. भीमा-कोरेगाव प्रकरणी शरद पवार यांची मुंबईमध्ये पत्रकार परिषद झाली. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. एल्गार परिषदेबाबत केंद्राने एवढी तत्परता का दाखवली? असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला आहे.
शिवसेनेची भूमिका जाहिरातदार ठरवत नाहीः उद्धव ठाकरे
एल्गार परिषद प्रकरणी महाराष्ट्र पोलिस आणि पुणे पोलिसांची चौकशी झाली पाहिजे. तसंच याप्रकरणाची एसआयटी चौकशी सुध्दा व्हावी. या प्रकरणाचा एकूण तपास आणि त्यानंतर जे पुरावे पोलिसांनी सादर केले त्यामधील सत्य समोर येईल. तुरुंगात डांबलेल्यांवर अन्याय झाला हे समोर येईल, असे शरद पवार यांनी सांगितले. पोलिसांनी अधिकाराचा गैरवापर केला आहे. तपासातून सत्यता बाहेर येईल त्यामुळे तपास तातडीने एसआयटीकडून काढून एनआयएकडे दिला असल्याचा आरोप शरद पवारांनी केला.
मोदी सरकारने बोलणं व डोलण्यापेक्षा काम करावं: शिवसेना
एल्गार परिषदेबाबत केंद्राने ऐवढी तत्परता का दाखवली? असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला आहे. तपास एनआयएकडे दिला तो केंद्र सरकारचा अधिकार आहे. मात्र राज्य सरकारला सुद्धा तपासाचा अधिकार आहे. याप्रकरणाची समांतर चौकशी व्हावी, अशी मागणी पवारांनी केली आहे. आमची तक्रार पोलिसांच्या वर्तनावर आहे. मागच्या सरकारने सत्तेचा गैरवापर केला असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे. या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करुन सत्यता बाहेर आणावी, असे शरद पवारांनी सांगितले.
कोरोनामुळे TISS मध्ये ईशान्य भारतीय विद्यार्थ्यांसोबत भेदभाव
दरम्यान, संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांनी त्या गावात वेगळे वातावरण निर्माण केले, असा आरोप पवारांनी केला आहे. भीमा कोरेगावला जाणाऱ्यांची संख्या आता वाढली. स्थानिक आणि बाहेरुन येणाऱ्यांमध्ये काही कटुता नव्हती, असे पवारांनी सांगितले. तसंच, एल्गार परिषदेला हजर नसललेल्या लोकांवर गुन्हा दाखल करुन त्यांना तुरुंगात टाकले गेले. या लोकांवर अन्याय झाला आहे. त्यांना अजूनही हवा तसा न्याय मिळाला नाही. राज्य सरकारने याप्रकरणाची माहिती कोर्टासमोर ठेवली. जे पुरावे सादर केले त्यामुळे त्यांना जामीन मिळाला नाही, असा आरोप देखील पवारांनी केला आहे.
बहावलपूर येथील बॉम्ब प्रूफ घरात लपून बसला आहे 'बेपत्ता' मसूद