पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आता नाराजी सोडून एकत्रितपणे लढले पाहिजे - शरद पवार

शरद पवार

राज्यात २८८ मतदारसंघ आहेत. सगळ्या गोष्टींचा विचार करून तिकीट वाटप करण्यात आले आहे. काहींनी याचे स्वागत केले आहे तर काही नाराज आहेत. पण आता लढाईची वेळ आहे. नाराजी सोडून देऊन सगळ्यांनी एकत्रितपणे लढले पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी कोल्हापुरात केले. कोल्हापुरातील गटबाजीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

भाजपचे घाटकोपर पूर्वतील उमेदवार पराग शहा ५००.६२ कोटींचे धनी

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवारी अखेरचा दिवस होता. या काळात राज्यात ५५३४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. शनिवारी अर्जांची छाननी होणार असून, अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारपर्यंत आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आता राज्यात प्रचाराला वेग येणार आहे. शरद पवार हे गेल्या काही दिवसांपासून सतत राज्यात विविध ठिकाणी दौऱ्यावर आहेत. कोल्हापूरमध्ये त्यांनी शनिवारी काँग्रेस नेते सतेज पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची भेट घेतली. यावेळी हसन मुश्रिफ यांच्यासह कोल्हापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित होते. 

आदित्यच्या उमेदवारीनंतर उद्धव ठाकरे यांनी मांडली महत्त्वाची भूमिका

कोल्हापुरातील गटबाजीचा फटका लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला बसला होता. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडीक यांचा पराभव झाला होता. विधानसभा निवडणुकीतील तिकीट वाटपानंतर काही जण नाराज आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर नाराजी विसरून सगळ्यांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.