पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शरद पवार ट्रेंडिंगमध्ये, अनेकांकडून 'साहेबां'ना सलाम!

शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी संध्याकाळी साताऱ्यामध्ये भरपावसात घेतलेली सभा महाराष्ट्रातील अनेक नागरिकांच्या मनात घर करून गेली. अनेकांनी या सभेचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून 'साहेबां'ना सलाम केला. त्यामुळे सोशल मीडिया साईट्सवर महाराष्ट्रात शनिवारी #SharadPawar ट्रेंड होतो आहे. ट्विटरवर हा हॅशटॅग महाराष्ट्रात ट्रेंडिंगमध्ये आहे. 

विधानसभा निवडणूक : प्रचार तोफा आज थंडावणार, आता वेध मतदानाचे

शरद पवार यांनी गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात झंझावाती प्रचार दौरा केला. त्यांनी राज्याच्या वेगवेगळ्या भागात जाऊन प्रचारसभा घेत भाजप-शिवसेनेच्या कारभाराचे वाभाडे काढले. युती सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कसे दुर्लक्ष केले आहे, यावर शरद पवार यांनी आपल्या सर्व भाषणांमध्ये जोर दिला. साताऱ्यामध्ये भरपावसात त्यांनी प्रचारसभा घेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती उदयनराजे भोसले यांना तिकीट देऊन चूक केल्याचे सांगितले. आपण जाहीरपणे याची कबुली देतो, असेही शरद पवार म्हणाले. साताऱ्यातील त्यांच्या भाषणापेक्षा भरपावसात उभे राहून त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेले बळ, सत्ताधारी युतीविरोधात लढण्यासाठी दाखवलेला खंबीरपणा याचीच चर्चा सोशल मीडियाच्या वर्तुळात सुरू झाली. निवडणुकीचे निकाल काहीही येवोत, शरद पवार यांनी आपल्या लढवय्या बाण्याने आमच्या मनात विजय मिळवला असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी आपल्या सोशल मीडिया हँडल्सवर प्रसिद्ध केल्या आहेत.

शरद पवार हे शब्द महाराष्ट्रात ट्रेंडिंगमध्ये आहेत

शरद पवार यांची साताऱ्यातील सभा झाल्यापासून अनेक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे त्याचे फोटो आपापल्या हँडल्सवर शेअर केले आहेत. यासोबत आपली मतेही मांडली आहेत. या सभेच्या फेसबुक लाईव्हचा व्हिडिओही मोठ्या प्रमाणात शेअर होतो आहे.

तुरुंगाऐवजी रमेश कदम ठाण्यातील फ्लॅटमध्ये, तिथूनच लाखोंची रोकड जप्त