पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शरद पवार राष्ट्रीय नव्हे तर बारामतीचे नेतेः प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

वंचित बहजुन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार हे आता राष्ट्रीय नेते राहिले नसून ते केवळ बारामतीचे नेते राहिल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा शेवट जवळ आला आहे, असेही ते म्हणाले.  

राष्ट्रवादीचे १० आमदार संपर्कात असल्याचा प्रकाश आंबेडकरांचा दावा

सोलापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत आंबेडकर बोलत होते. मुस्लिम मतांबाबत बोलताना ते म्हणाले की. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीला काँग्रेसची मते मिळाली नाहीत. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या क्षणी मुस्लिम लोक आमच्याकडून निसटले. मौलवींनी फतवे काढले, प्रसिद्धी माध्यमाचा वापर केल्यामुळे काही मते ही विरोधकांना गेली. मुस्लिम समाज आणखी आमच्याबरोबर आला तर आम्ही ३० टक्क्यांवर येऊन पोहचू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मी सुपारी घेतल्याचा ज्यांनी आरोप केला. ते काहीही सिद्ध करु शकले नाहीत. माझ्यावर आरोप करणारेच आरोपी आहेत. आम्हाला जनतेने स्वीकारले आहे. आम्ही आता विधानसभेची तयारी करत आहोत. विधानसभेला काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा आम्हीच प्रमुख विरोधक आहोत. वंचित आघाडी मुख्य राजकीय पक्ष असेल. सत्तेच्या नादात काँग्रेस-राष्ट्रवादीने सत्तेचे विघटन केले आहे. त्यांना पुन्हा संघटना उभा करायची असेल तर दोघांनी वेगवेगळे लढले पाहिजे, असा सल्ला आंबेडकर यांनी दिला. 

राज ठाकरे यांच्याबाबत बोलताना त्यांनी म्हटले की, राज हे राजकारणातील अत्यंत हुशार व्यक्ती आहेत. ते विरोधकांना जागा देतील असे मला वाटत नाही. १५३ मतदारसंघातील जागा मनसेसाठी खुल्या आहेत.