पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेसचे बहुतांश आमदार शिवसेनेच्या नेतृत्त्वाखालील सरकारच्या बाजूने

मुंबईत लागलेले शिवसेनेचे पोस्टर

काँग्रेसमधील आमदारांचा एक मोठा गट भाजपवगळून शिवसेनेच्या नेतृत्त्वाखालील सरकारला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत करण्याच्या बाजूने असल्याचे दिसते आहे. त्यामुळेच शिवसेनेची भाजपसोबतच्या वाटाघाटींमधील बार्गेनिंग पॉवर वाढली आहे. शिवसेना-भाजप युतीच्या बाजूने लोकांनी कौल दिला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले असले तरी सत्ता स्थापनेसाठी 'थांब आणि वाट पाहा' हीच भूमिका पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सध्या स्वीकारली आहे. त्यामुळे भविष्यात वेगळे काही घडू शकते, हे सुद्धा स्पष्ट आहे. 

'महाराष्ट्रासाठी आता एकच गोड बातमी, शिवसेनेचा मुख्यमंत्री'

काँग्रेसच्या अनेक आमदारांनी आणि विशेषतः तरूणांनी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिण्याचे ठरविले आहे. राज्यातील मोठ्या वर्गालाही भाजपला सत्तेतून बाहेर ठेवावे, असेच वाटत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. शिवसेनेला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा देण्यास काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी फारसे अनुकूल नाही. तरीही काँग्रेसचे आमदार आपल्या भावना स्पष्टपणे व्यक्त करीत आहेत. पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, काँग्रेसचे तरूण नेते म्हणजेच विश्वजीत कदम, सतेज पाटील, अमित देशमुख यांना असे वाटते आहे की पर्यायी सरकारचा प्रयत्न केला गेला पाहिजे. त्यासाठी शरद पवार यांनीही प्रयत्न केले पाहिजेत. बुधवारी सकाळी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनीही शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी काहीवेळ चर्चा केली. आता पक्षातील तरुणांनी आपली मते खुलेपणाने मांडण्यास सुरुवात केल्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाही भूमिका घ्यावी लागू शकते.

सत्ता स्थापनेचा तिढा कायम; काँग्रेस नेते सोनिया गांधीची भेट घेणार

भाजपला सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे, असे पक्षातील अनेकांना वाटत असल्याचे मावळत्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. राज्यातील लोकांनाही आता भाजपचा कंटाळा आला असून, त्यांनाही भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. शिवसेना जोपर्यंत युतीतून बाहेर पडत नाही, तोपर्यंत कोणत्याही पर्यायी सरकारचा विचार करता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.