पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर यांचं निधन

दिवंगत नेते बाबासाहेब धाबेकर

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी जलसंधारण मंत्री बाबासाहेब धाबेकर (वय ८९) यांचे आज (मंगळवार) मुंबईत निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी ११.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी, २ मुले असा परिवार आहे. धाबा येथील घरी त्यांचे पार्थिव उद्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी १२ च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येतील. बाबासाहेब धाबेकर हे बार्शीटाकळी तालुक्यातील धाबा (जि. अकोला) गावचे रहिवासी होते.

आमदार फुटण्याची भीती नाही, बाळासाहेब थोरात यांना खात्री

उपसरपंच, सरपंच, बार्शीटाकळी पंचायत समिती सदस्य, सभापती, जिल्हा परिषद सदस्य, जि.प. सभापती नंतर अध्यक्ष असा प्रवास करीत त्यांनी कारंजा मतदारसंघातून अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवली. त्यात ते विजयीसुद्धा झाले. आमदार झाल्यानंतर शिवसेना-भाजप युतीला पाठिंबा दिला. याच सरकारमध्ये त्यांची कॅबिनेटमंत्रीपदी वर्णी लागली. त्यांनी मंत्रिपदाच्या काळात उल्लेखनीय काम केले होते.

शिवसेनेने ठरवल्यास राज्याला पर्यायी सरकार देऊः नवाब मलिक