पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

औरंगाबादमध्ये ५० लाखांचा सॅनिटायझरचा साठा जप्त

सॅनिटायझरचा साठा जप्त

औरंगाबादमध्ये सॅनिटायझरचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे. औरंगाबादच्या वाळूज परिसरातील युरोलाईफ हेल्थ केअर कंपनीवर कारवाई करत ५० लाखांचा सॅनिटायझरचा साठा जप्त करण्यात आला आहे. मुदत संपलेल्या सॅनिटायझरवर मुदत वाढीचे लेबल आणि किंमत बदलून ते बाजारात विक्रीसाठी पाठवण्यात आले होते. 

कोरोनामुळे बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद अडकले जर्मनीत

युरोलाईफ हेल्थ केअर कंपनी सॅनिटायझरवरील एक्सपायरी डेट आणि किंमत बदलून विकत होते. अन्न व औषध प्रशासनाला याबाबत गोपनिय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे औरंगाबाद एफडीएचे ड्रग्ज इन्स्पेक्टर राजगोपाल बजाज यांच्या नेतृत्वाखाली कंपनीवर धाड टाकण्यात आली. यावेळी ५० लाखांचा सॅनिटायझरचा साठा जप्त करण्यात आला. 

मध्य प्रदेश विधानसभेचे अधिवेशन २६ मार्चपर्यंत स्थगित 

एफडीए अधिकारी राजगोपाल बजाज यांनी सांगितले की, एफडीएने युरोलाईफ हेल्थ केअर कंपनीवर कारवाई करत ५० लाखांचा सॅनिटायझरचा साठा जप्त केला. कंपनीने गुजरातमधून सॅनिटायझर औरंगाबादला आणले होते. ज्याची वापरण्याची मुदत (एक्स्पायरी डेट) मार्च- एप्रिल २०२० मध्ये संपत होती. ही मुदत एका वर्षाने वाढवण्यात आली होती. लेबल बदलून त्यांनी सॅनिटायझर बाजारात विक्रीसाठी पाठवले होते. तसंच, हे सॅनिटायझर बनावट आहे की नाही हे तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.   

मांडवा बोट दुर्घटना: बोट मालकासह चौघांविरोधात गुन्हा दाखल

दरम्यान, युरोलाइफ हेल्थकेअरचे चीफ मार्केटिंग ऑफिसरने याबद्दल सांगितले की, 'युरोलाइफच्या अनेक उत्पादनांच्या किंमती कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कमी केल्या गेल्या आहेत. मार्केटमधील कोणतीही सॅनिटायझरची बॉटल कालबाह्य तारखेनंतरची नाही. तसंच सॅनिटायझरच्या किमती बदलण्याचा निर्णय फेब्रुवारी २०२०मध्येच घेण्यात आला होता. मार्केटमधील सर्व ब्रँडच्या उत्पादनाच्या किमती आमच्यापेक्षा जास्त होत्या. या परिस्थितीत आमच्या फक्त तीन उत्पादनांची किमती बदलण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. 

कोरोनाचा आशियातील सर्वात मोठ्या देहविक्री व्यवसायालाही फटका