पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लातूरमध्ये स्कूल व्हॅनने चिमुकलीला चिरडले

स्कूल व्हॅनने चिमुकलीला चिरडले

ज्या स्कूल व्हॅनने चिमुकलीला घरासमोर सोडले त्याच गाडीने तिला चिरडले. ही धक्कादायक घटना लातूर शहरामध्ये घडली आहे. लातूरच्या आयडियल इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी गायत्री हंगे हिचा अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गायत्रीच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे. 

नागपूरमध्ये मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून ३ मजुरांचा दुर्देवी मृत्यू

सहा वर्षाची गायत्री नेहमीप्रमाणे शाळे सुटल्यावर स्कूल व्हॅनने घरी येत होते. स्कूल व्हॅन चालकाने तिच्या घरासमोर गाडी उभी केली. गायत्री गाडीतून उतरली. मात्र गायत्री कोणत्या दिशेने घराकडे जात आहे हे व्हॅनचालकाच्या लक्षात आले नाही. त्याचवेळी गाडी पुढे घेत असताना त्याखाली गायत्री चिरडली आणि ती गंभीर जखमी झाली. गुरुवारी संध्याकाळच्या दरम्यान ही घटना घडली. 

खूशखबर; SBI कडून IMPS, NEFT आणि RTGS निशूल्क

अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या गायत्रीच्या कुटुंबियांनी तिला ताबडतोब लातूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान रात्री उशिरा गायत्रीचा मृत्यू झाला. गायत्रीच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबियांना मानसिक धक्का बसला आहे. त्याचसोबत या घटनेमुळे किणगावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान याप्रकरणी लातूर पोलिसांकडून तपास सुरु आहे. 

बिहारमध्ये जदयू नेत्याची पोलीस ठाण्यात आत्महत्या