सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची बुधवारी रात्री अचानक प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना तातडीने साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रक्तदाबाचा त्रास वाढल्याने त्यांची तब्येत बिघडल्याचे सांगण्यात येते. सध्या त्यांच्यावर उपचार करण्यात आले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अधिक उपचारासाठी ते मुंबईकडे रवाना झाले आहेत.
शिवभोजन योजनेचा विस्तार, थाळीची संख्या दुप्पट
आमदार शिवेंद्रराजे भोसले हे बुधवारी त्यांच्या ‘सुरुची’ बंगल्यावर होते. यावेळी त्यांनी रात्री उशिरा छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यांच्या कुटुंबीयांनी तात्काळ साताऱ्यातील प्रतिभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
राज्यात शिवजयंतीचा उत्साह; राज्यपालांनी केले शिवरायांना अभिवादन
त्यांची प्रकृती ठीक असून त्यांना बरे वाटल्यास घरी सोडणार असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले होते. मात्र, त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आल्याचे वृत्त विविध वृत्त वाहिन्यांनी दिले आहे.