पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'मध्य प्रदेशचा व्हायरस' महाराष्ट्रात घुसणार नाहीः संजय राऊत

संजय राऊत

ज्योतिरादित्य शिंदेंमुळे मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये भूकंप झाला आहे. ज्योतिरादित्य शिंदेंबरोबर काँग्रेसचे १९ ते २० आमदार भाजपमध्ये दाखल होणार असल्याचे बोलले जाते. यामुळे कमलनाथ सरकार संकटात आले आहे. महाराष्ट्रातही मध्य प्रदेश पॅटर्न राबवला जाणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.  दरम्यान, शिवसेना नेते तथा राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी मात्र निश्चिंतता व्यक्त केली आहे. महाराष्ट्राची 'पॉवर' वेगळी आहे. एक ऑपरेशन १०० दिवसांपूर्वी फसले आहे. त्यानंतर महाविकास आघाडीने बायपास ऑपरेशन करून महाराष्ट्र वाचवला. मध्य प्रदेशचा व्हायरस महाराष्ट्रत घुसणार नाही. चिंता नसावी, असे टि्वट त्यांनी केले आहे. 

मध्य प्रदेशमधील राजकीय घडामोडींनंतर राहुल गांधींचा मोदींना टोमणा

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार आहे. मध्य प्रदेशनंतर हाच फॉर्म्युला भाजप महाराष्ट्रात राबवला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातही खळबळ उडाली आहे.

..भाजपला अनेक जन्मे घ्यावे लागतीलः मुंडे
संजय राऊत यांनी महाराष्ट्रात असे काही होणार नसल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते तथा सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. मध्य प्रदेशसारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण करायला भाजपला अनेक जन्म घ्यावे लागतील. काही भाजपचे नेते यासाठी मुहूर्त शोधत आहेत. मुहूर्त शोधणे त्यांचे काम आहे मात्र भाजपला महाराष्ट्रात असा आनंद घेता येणार नाही, असे ते म्हणाले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Sanjay Raut said in the midst of MP crisis Madhya Pradesh virus will not enter Maharashtra