पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बहुमत चाचणीवर संजय राऊत म्हणतात, 170+++++

संजय राऊत

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडी आज विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाणार आहे. तत्पूर्वी, शिवसेना नेते तथा राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी पुन्हा एकदा टि्वट करुन महाविकास आघाडी विश्वासदर्शक ठराव सहजपणे जिंकेल असा दावा केला आहे. 

'सेव्ह मेट्रो सेव्ह मुंबई', CM ठाकरेंच्या निर्णयावर फडणवीसांचा नारा

राऊत यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले की, आज बहुमत दिन..
170+++++
हमको मिटा सके ये जमाने में दम नहीं, 
हमसे जमाना खुद है... जमाने से हम नहीं. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी राज्याचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ठाकरे घराण्यातील पहिले आणि शिवसेनेचे ते तिसरे मुख्यमंत्री ठरले. गुरुवारी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सहा मंत्र्यांनी शपथ घेतली. विश्वासदर्शक ठरावानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे.