पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'भाजप-शिवसेनेच्या सत्तानाट्यामध्ये काँग्रेसने पडू नये'

संजय निरुपम

सत्तास्थापन करण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जे नाट्य सुरू आहे. त्यामध्ये काँग्रेसने पडू नये. या दोन्ही मित्र पक्षातील वाद केवळ जास्तीत जास्त मंत्रिपदे स्वतःच्या पदरात पाडून घेण्यासाठी सुरू आहे, असे काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विटच्या माध्यमातून काँग्रेस नेत्यांना या दोघांच्या नाट्यापासून चारहात लांब राहण्याचा सल्ला दिला आहे.

शिवसेनेने ठरवले तर बहुमत जमवू शकते, संजय राऊतांचा भाजपला इशारा

आपल्या ट्विटमध्ये संजय निरुपम म्हणतात, सत्तेत जास्तीत जास्त वाटा मिळवण्यासाठी या दोघांमध्ये राजकीय नाट्य सुरू आहे. ते दोघेही नक्की पुन्हा एकत्र येतील आणि आपल्याला बदनाम करण्याचे काम सुरूच ठेवतील. अशा स्थितीत काँग्रेसचे काही नेते शिवसेनेला पाठिंबा देण्याचा विचारही कसा काय करू शकतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

'तिढा सुटेपर्यंत मला मुख्यमंत्री करा, दखल न घेतल्यास आंदोलन करू'

सत्तेत समान वाटा आणि अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्यावर शिवसेना अद्याप ठाम आहे. तर दुसरीकडे भाजपकडून शिवसेनेशी वाटाघाटी करण्यासाठी कोणत्याही हालचाली होताना दिसत नाही. त्यामुळे राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. दोन्ही पक्षांचे काही नेते उलटसुलट विधाने करून परिस्थिती जास्तच बिघडवत आहेत.