पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सांगलीत एसटी बस पलटी होऊन ३८ विद्यार्थी जखमी

सांगली एसटी बस अपघात

सांगलीमध्ये एसटी बस पलटी होऊन अपघात झाला आहे. विटा-वाळूज मार्गावरील विटा गावाजवळ ही घटना घडली आहे. या अपघातामध्ये एसटी बसमधील ३८ विद्यार्थी जखमी झाले आहेत. अपघातातील जखमी विद्यार्थ्यांना विटा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसकडून बीडमधील ५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
 
विटा गावाजवळील वळणावर एसटी बस पलटी झाली. सांगलीच्या विटा आगाराची बस वाळूजकडे जात होती. या बसमधून शाळेत जाणारी ५० ते ५५ विद्यार्थी प्रवास करत होते. विटा गावाजवळ समोरुन येणाऱ्या टेम्पोला जागा देण्याच्या नादात एसटी बस पलटी झाली. या अपघातामध्ये ३८ विद्यार्थ्यांसह एसटी बसचा चालक आणि वाहक देखील जखमी झाला आहे. 

देशात ई-सिगारेटवर बंदी, एक वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना नजीकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. ३ ते ४ विद्यार्थ्यांच्या पायाला फॅक्चर झाले आहे. तर काही विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

'कलम ३७० रद्द करून नरेंद्र मोदींनी सरदार पटेलांचे स्वप्नच पूर्ण