पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सांगलीत नगरसेवकांमध्ये 'फ्री स्टाईल' हाणामारी

सांगली हाणामारी

सांगलीच्या जत नगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. सुरुवातीला पालिका सभागृहामध्ये या नगरसेवकांमध्ये वादावादी झाली आणि ते एकमेकांवर धावून गेले. त्यानंतर पालिकेच्या बाहेर उभ्या असलेल्या नगरसेकांच्या समर्थकांनी राडा करत हाणामारी केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  

गुजरातमध्ये तीन मजली इमारत कोसळून दोघांचा मृत्यू

सांगलीच्या नगरपालिकेमध्ये सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये वाद झाले. भाजपचे नगरसेवक उमेश सावंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सभापती लक्ष्मण उर्फ टिमु एडके यांच्यामध्ये पालिकेतील महासभे दरम्यान वाद झाला.  प्रभागातील विकास कामांवरुन दोघांमध्ये सुरुवातीला शाब्दिक वाद झाला. त्यानंतर दोघांमध्ये हाणामारी झाली. सभागृहातील उपस्थित इतर नगरसेवकांनी दोघांना शांत केले. 

राज्याच्या निवडणूक आयुक्तपदी मदान

त्यानंतर, या घटनेची माहिती मिळताच पालिकेच्या बाहेर दोन्ही नगरसेवकांचे समर्थक जमले. दोन्ही नगरसेवक सभागृहाबाहेर येताच त्यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला आणि या नगरसेवकांचे समर्थक आमने-सामने आले. दोन्ही गटामध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. हा सर्व प्रकार भर रस्त्यामध्ये घडला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी दोन्ही नगरसेवकांसह आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

एअरसेल प्रकरणात चिदंबरम आणि त्यांच्या मुलाला दिलासा