पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सलग सहाव्या दिवशी सांगलीत पुराचे पाणी, पाणी पातळी एक फुटाने उतरली

सांगलीत महापूर

सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीचे पाणी शनिवारीही फारसे कमी झालेले नाही. पाण्याची पातळी ५७.८ मीटरवरून ५६.५ मीटरपर्यंत कमी झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पूरस्थिती अद्याप गंभीर स्वरुपाची आहे. लाखाहून अधिक लोकांचे स्थलांतर करण्यात आले असून, जिल्ह्यात अद्याप एनडीआरएफ, लष्कर आणि नौदलाच्या तुकड्या कार्यरत आहेत. जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात पूरामुळे 29 जणांचा मृत्यू; 6 बेपत्ता

कर्नाटकमधील आलमट्टी धरणातून शुक्रवारी रात्रीपासून ४८०००० क्सुसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पण मोठा फरक अद्याप सांगलीमध्ये जाणवलेला नाही. सांगलीतील पुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली असली, तरी त्यामध्ये मोठी घट झालेली नाही. त्यामुळे नागरिकांना सुरक्षितस्थळीच राहावे लागते आहे. सांगलीमध्ये एक लाखापेक्षा जास्त लोकांना पूरातून बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. अनेक नागरिक हे घराच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यावर राहात आहेत.

सांगलीमध्ये सध्या शिजवलेले अन्नपदार्थ आणि पाणी यांची मोठी गरज आहे. काही स्वयंसेवी सस्थांकडून पदार्थांचे पॅकेट्स वितरत करण्यात येत आहेत. मुंबईतील सिद्धिविनायक ट्रस्ट कडून ११ लाख लिटर्स पिण्याचे पाणी सांगली-कोल्हापूरमध्ये पाठविण्यात येणार आहे. राज्य सरकारने औषधे-इंजेक्शन यांचा मोठा साठा सांगली-कोल्हापूरकडे रवाना केला आहे. पुराचे पाणी ओसरल्यावर येऊ घातलेल्या आजारांचा मुकाबला करण्यासाठी सरकार सज्ज असल्याचे सांगण्यात आले.

राज्यातील पूरस्थितीमुळे एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली

सांगलीमध्ये शुक्रवारी सांगलवाडी, हरिपूर, झुलेलाल चौक या भागात बचावकार्य करण्यात आले. जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडल्यामुळे तेथील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी गेल्या दोन-तीन दिवसांपासून प्रयत्न करण्यात येत आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे कालपासून सांगलीमध्येच तळ ठोकून आहे.