पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सांगलीतील पूरस्थिती जैसे थे, नौदलाची १२ पथके बचावकार्यासाठी रवाना

पुराच्या पाण्यातून वयोवृद्धांना बाहेर काढण्यात आले

कोयनेतील विसर्ग कमी करण्यात आला असला आणि कर्नाटकातील आलमट्टी धरणातील विसर्ग पाच लाख क्युसेक्सवर नेण्यात आला असला, तरी सांगलीतील पूरस्थिती अद्याप कायम आहे. सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत शुक्रवारी वाढ झालेली नसली, तरी त्यामध्ये घटही झालेली नाही. त्यामुळे सांगली जिल्ह्याच्या काही भागात आणि शहरात शिरलेले पाणी अद्याप कमी झालेले नाही. प्रशासनाकडून शुक्रवारी सांगलीवाडी, हरिपूर, झुलेलाल चौक या भागात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी काम करण्यात येत आहे. नौदलाची १२ पथके सांगलीमध्ये बचावकार्यासाठी रस्त्याने निघाली आहे. या पथकांना सांगलीपर्यंत आणण्यासाठी ग्रीन कॉरिडॉरही तयार करण्यात आला आहे.

पंचगंगेच्या पाणी पातळीत घट, पण कोल्हापुरात पूरस्थिती अद्याप कायम

सांगलीमध्ये शुक्रवारी पहाटे जोरदार पाऊस होता. त्यातच हवामान विभागाने कोल्हापूर, सांगलीमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. सांगलीमध्ये बचावकार्यासाठी एनडीआरएफ, नौदल, लष्कर, एसडीआरएफ दाखल झाले असून, पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बोटींची संख्याही वाढविण्यात आली आहे. शुक्रवारी आणखी बोटी बचावकार्यासाठी दाखल होत आहेत. 

जे लोक बैठ्या घरांमध्ये आहेत त्यांना सुरक्षित स्थळी हलिवण्याला प्रशासनाकडून प्राधान्य देण्यात येत आहे. तर बहुमजली इमारतीमध्ये असलेल्या लोकांना वरच्या मजल्यावर जाण्यास सांगण्यात आले आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना खाद्यपदार्थांची पॅकेट्स पोहोचविण्यात येणार आहे. त्यासाठी हवाई दलाची, तटरक्षक दलाची मदतीही घेतली जाणार असल्याची माहिती मिळते आहे.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मराठी कलाकार सरसावले

सांगलीमध्येही गेल्या चार दिवसांपासून पूरस्थिती कायम असल्यामुळे लाखापेक्षा जास्त लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. सांगली शहरातील मारुती रोड, नळभाग, गावभाग, एसटी स्टॅण्ड परिसर पाण्याखाली गेला आहे.