पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सांगली शहरात कोरोनाचा शिरकाव, बँक कर्मचाऱ्याला लागण

कोरोना

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. अशात सांगली शहरामध्ये कोरोनाने शिरकाव केला असून एका बँक कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर बँक कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील ५ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. 

लॉकडाउन: २५ दिवसांत घरगुती हिंसाचाराच्या तक्रारीत ९५ टक्क्यांनी वाढ

कोरोनाची लागण झालेल्या बँक कर्मचाऱ्याने गेल्या महिन्यापासून कुठेही प्रवास केलेला नाही. सांगली शहरातील विजयनगर भागामध्ये ही व्यक्ती राहते. १५ एप्रिल रोजी त्यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना न्यमोनिया झाल्याचे समोर आले. प्रकृती जास्त खालावल्यामुळे त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. तर कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. 

विमानसेवा सुरु करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही: केंद्र सरकार

या बँक कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील ५ सदस्यांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. तसंच रुग्णालयात त्यांच्यावर ज्या डॉक्टरांनी आणि कर्मचाऱ्यांनी उपचार केले आहेत. त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. तर बँकेतील कर्मचारी आणि बँकेत येऊन गेलेल्यांची माहिती गोळा करण्याचे काम पोलिसांकडून सुरू करण्यात आले आहे. तसंच ज्या परिसरात ही व्यक्ती राहते तो परिसर सील करण्यात आला आहे. 

भारतात कोरोनाबाधितांचा आकडा १५ हजार पार, ५०० रुग्णांचा मृत्यू