पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सांगलीत ३ अल्पवयीन मुलांचे अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुटका

महिलेसमोर अश्लिल कृत्य करणाऱ्याला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे.

सांगलीतील तीन अल्पवयीन मुलांचे अपहरण करून त्यांना पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते आणि विश्रामबाग पोलिसांनी मुलांचे अपहरण करण्याचा डाव हाणून पाडला. विश्रामबाग पोलिसांनी सातारा रेल्वे स्थानकावरुन तिन्ही मुलांची सुखरुप सुटका केली. 

 

कामकाजात अडथळा आणल्याबद्दल काँग्रेसचे सात सदस्य लोकसभेतून निलंबित

सांगलीच्या हनुमाननगर परिसरात राहणारी तीन मुलं बेपत्ता झाली होती. याबाबत त्यांच्या पालकांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तातडीने मुलांचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्याचवेळी तिन्ही मुलं एका व्यक्तीसोबत महालक्ष्मी एक्स्प्रेस रेल्वेमधून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सांगली पोलिसांनी सातारा पोलिसांशी संपर्क करत त्यांना याची माहिती दिली. 

निर्भया प्रकरण : चारही दोषींना २० मार्चला पहाटे फासावर लटकवण्याचे आदेश

महालक्ष्मी एक्स्प्रेस सातारा रेल्वे स्थानकावर येताच सांगली पोलिसांनी रेल्वे पोलिसांच्या मदतीने मुलांची सुटका केली. त्यांचे अपहरण करुन पळवून नेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. आरोपीने या मुलांना तुमच्या वडिलांनी तुम्हाला बोलावले असल्याचे सांगून त्यांना महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये बसवले. त्यांना घेऊन तो मुंबईच्या दिशेने निघाला होता. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुलांची सुटका झाली आहे. या मुलांना त्यांच्या पालकांकडे सोपवण्यात आले आहे. 

केंद्राकडून पीएफवरील व्याज दरात घट; ६ कोटी कर्मचाऱ्यांना बसणार