पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सांगलीत महापूराचा रुद्रावतार; प्रशासनाची यंत्रणा कोलमडली

सांगली पूर

सांगली जिल्ह्यातली पूरस्थिती गंभीर होत चालली आहे. या पूराने 2005 साली आलेल्या महापूराचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी 56.10 फुटांवर पोहचली आहे. त्यामुळे संपूर्ण सांगली शहराला पूराने विळखा घातला आहे. शहरातील टिम्बर भाग, कॉलेज कॉर्नर, जिल्हाधिकारी निवासस्थान, आंबेडकर रोड, शंभरफुटी, डी मार्टपर्यंत कमरेपर्यंत पाणी साचले आहे. पूरामध्ये मोठ्या संख्येने नागरिक अडकले आहेत. एनडीआरएफ आणि लष्कराकडून त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 

पुण्यात खडकवासला धरणातील विसर्ग वाढविला

सांगली शहरासह कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या गावांना देखील पुराचा फटका बसला आहे. या पुरामध्ये हजारो नागरिकांसह जनावरं अडकली आहे. पलूस तालुक्यातील 22 गावांना, वाळवा तालुक्यातील 30 गावांना आणि शिराळा तालुक्यातील 17 गावांना महापूराचा फटका बसला आहे. आतापर्यंत 90 हजारांपेक्षा जास्त नागरिकांचे आणि 22 हजारांपेक्षा जास्त जनावरांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या नागरिकांना तात्पुरत्या निवाऱ्याची सोय प्रशासनाकडून करण्यात आली असून त्यांना अन्न आणि पाणी पुरवठा केला जात आहे.  

पीडीपीच्या दोन खासदारांना राजीनामा देण्याचे आदेश

महापूरामुळे सांगलीचे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. महापूराचे पाणी दुकानात बाजारपेठेमध्ये शिरल्यामुळे ते बंद ठेवण्यात आली आहेत. शहरातील दूध, सिलेंडर, भाजीपाला, एटीएमसेवा बंद पडली आहे. त्यामुळे लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. तसंच या महापूरापुढे सांगली जिल्ह्याची आपत्ती यंत्रणा पूर्णत: कोलमडली आहे प्रशासनाच्या संपर्क यंत्रणेसह बोटी सुद्धा बंद पडल्या आहेत. दरम्यान, एनडीआरएफची टीम, लष्कराचे जवान आणि नौदलाकडून बचावकार्य युध्दपातळीवर सुरु आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री सांगलीतील पूरग्रस्त भागांची पाहणी करण्याची शक्यता आहे. 

अभिनंदन वर्थमान यांना वीरचक्र जाहीर होण्याची शक्यता